कंधाणेतील महिलेचा स्वाइन फ्लूने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 01:41 IST2018-10-15T01:39:41+5:302018-10-15T01:41:03+5:30

कंधाणे येथील महिलेचा स्वाइन फ्लूने नाशिक येथील खासगी रुग्णालयामध्ये मृत्यू झाला. अलकाबाई विठ्ठल बिरारी (५६) असे मृत महिलेचे नाव आहे.

Swine flu deaths in a woman in Sindhana | कंधाणेतील महिलेचा स्वाइन फ्लूने मृत्यू

कंधाणेतील महिलेचा स्वाइन फ्लूने मृत्यू

कंधाणे : येथील महिलेचा स्वाइन फ्लूने नाशिक येथील खासगी रुग्णालयामध्ये मृत्यू झाला. अलकाबाई विठ्ठल बिरारी (५६) असे मृत महिलेचे नाव आहे. त्यांच्यावर गेल्या दहा दिवसांपासून उपचार सुरू होते. रविवारी (दि. १४) सकाळी १० वाजता त्यांचा मृत्यू झाला.
गावात साथरोगांनी डोके वर काढले आहे. बिरारी यांच्यावर सटाण्यात उपचार सुरू होते. प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्यांना नाशिक येथे हलविण्यात आले. उपचारा दरम्यान रविवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला. आरोग्य विभागातील एकही कर्मचारी रात्रीच्या वेळेस मुख्यालयी राहत नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.

Web Title: Swine flu deaths in a woman in Sindhana