महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी स्वाती जाधव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2022 01:31 IST2022-05-30T01:31:06+5:302022-05-30T01:31:30+5:30

काँग्रेस पक्षात आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक बदल करण्यात येत असून महिला जिल्हाध्यक्षपदी स्वाती राजेश जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Swati Jadhav as District President of Mahila Congress | महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी स्वाती जाधव

महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी स्वाती जाधव

नाशिक- काँग्रेस पक्षात आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक बदल करण्यात येत असून महिला जिल्हाध्यक्षपदी स्वाती राजेश जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या आई वत्सला खैरे शहर काँग्रेसच्या अध्यक्ष आहेत. त्यामुळे मायलेकींना शहराध्यक्ष, जिल्हाध्यक्ष पद एकाच वेळी भूषविण्याचा अभिनव याेग जुळून आला आहे. खैरे कुटुंबीय काँग्रेसमध्ये पिढीजात असून स्वाती जाधव या गेल्या सात वर्षांपासून पक्षाच्या कार्यकारिणीत विविध पदे भूषवित आहेत. वर्षभरापूर्वी त्यांची प्रदेश महिला काँग्रेसच्या सचिवपदी निवड करण्यात आली होती. आता पुन्हा संघटनात्मक फेरबदलात त्यांना जिल्हाध्य पदी नियुक्त करण्यात आले आहे. लवकरच अन्य संघटनात्मक बदल देखील होणार असल्याची चर्चा आहे. तथापि, आता महापालिका निवडणुका तोंडावर असल्याने महत्त्वाचे बदल लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.

Web Title: Swati Jadhav as District President of Mahila Congress