सावरगावच्या तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2018 01:41 IST2018-08-26T01:40:23+5:302018-08-26T01:41:02+5:30

 Suvargaon's young farmer suicides | सावरगावच्या तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

सावरगावच्या तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

न्यायडोंगरी : नांदगाव तालुक्यातील सावरगाव येथील तरुण शेतकरी राजेंद्र जाधव (४०) यांनी कर्ज व घरखर्च भागत नसल्याने राहत्या घरी मध्यरात्री घराच्या छतास गळफास बांधत आत्महत्या केली. सकाळ झाली पती अजून उठत नाही म्हणून पत्नी उठविण्यासाठी गेली असता त्यांनी फाशी घेतल्याचे लक्षात आले. ही वार्ता गावात पसरताच राजूच्या घराकडे ग्रामस्थांनी धाव घेतली. दरम्यान, सदर घटनेची माहिती पोलीसपाटील सोमनाथ शेलार यांनी नांदगाव पोलिसांना देताच नांदगाव पोलीस पथक घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी नांदगाव येथे पाठविण्यात आला. राजेंद्र जाधव यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, मुलगा, आई, वडील असा परिवार आहे. घरातील एकमेव कमविता तरु ण गेल्याने संपूर्ण कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मनमिळावू स्वभाव असलेल्या राजेंद्रच्या जाण्याने संपूर्ण गाव व परिसरावर शोककळा पसरली आहे. शनिवारी दु.२ वाजता सावरगाव येथे मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पुढील तपास नांदगाव पोलीस करीत आहेत.

Web Title:  Suvargaon's young farmer suicides