दुचाकी जळीत प्रकरणातील संशयित मोकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2018 00:40 IST2018-07-17T00:40:23+5:302018-07-17T00:40:39+5:30

मखमलाबाद गावातील सिद्धिविनायक अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये उभ्या केलेल्या चार दुचाकी जाळल्याची घटना काल रविवारी (दि.१५) मध्यरात्रीच्या सुमारास घडली होती़ या दुचाकी जाळपोळीतील संशयितांचा शोध घेण्यास अद्यापही म्हसरूळ पोलिसांना यश आलेले नसून ते मोकाट आहेत़

 Suspicious foul play in the case of two wheelers | दुचाकी जळीत प्रकरणातील संशयित मोकाट

दुचाकी जळीत प्रकरणातील संशयित मोकाट

पंचवटी : मखमलाबाद गावातील सिद्धिविनायक अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये उभ्या केलेल्या चार दुचाकी जाळल्याची घटना काल रविवारी (दि.१५) मध्यरात्रीच्या सुमारास घडली होती़ या दुचाकी जाळपोळीतील संशयितांचा शोध घेण्यास अद्यापही म्हसरूळ पोलिसांना यश आलेले नसून ते मोकाट आहेत़ यामुळे म्हसरूळ पोलिसांच्या कामगिरीबाबत संशय व्यक्त केला जात आहे.  सिद्धिविनायक अपार्टमेंटमधील विजय भामरे, शारदा बुरकुले, संतोष मोरे व सुरेश मोरे या चौघांच्या चार दुचाकींना रविवारी मध्यरात्री अज्ञात समाजकंटकांनी आग लावून पेटवून दिल्याची घटना घडली होती़ या परिसरात दहशत माजविण्याच्या हेतूनेच समाजकंटकांनी पार्किंगमधील या दुचाकींची जाळपोळ केली असण्याची शक्यता पोलीस सूत्रांनी वर्तविली होती. या घटनेनंतर पोलीस तपास करून संशयितांच्या मुसक्या आवळतील, अशी नागरिकांना अपेक्षा होती़ मात्र, या दुचाकी जळीत प्रकरणात पोलिसांना कोणतेही धागेदोरे हाती लागलेले नाहीत़ त्यामुळे या संशयितांचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे़

Web Title:  Suspicious foul play in the case of two wheelers