शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
5
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
6
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
7
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
8
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
9
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
10
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
11
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
12
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
13
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
14
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
15
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
16
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
17
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
18
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
19
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
20
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना

सागवान लाकूड चोरीप्रकरणातील संशयिताचा मारहाणीत मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2020 00:31 IST

सुरगाणा : तालुक्यातील उंबरठाण वनपरिक्षेत्रात सागवान लाकूड चोरीप्रकरणी अटक करून सोडून देण्यात आलेल्या गुजरातमधील युवकाचा मृत्यू महाराष्ट्र वनकर्मचाऱ्यांनी केलेल्या मारहाणीमुळे झाल्याची तक्रार मयत युवकाच्या आईने धरमपूर पोलिसांत दिली असून, याप्रकरणी सखोल चौकशीची मागणी केली आहे.

ठळक मुद्देमयताच्या आईची तक्रार : वनकर्मचाऱ्यांवर संशय

सुरगाणा : तालुक्यातील उंबरठाण वनपरिक्षेत्रात सागवान लाकूड चोरीप्रकरणी अटक करून सोडून देण्यात आलेल्या गुजरातमधील युवकाचा मृत्यू महाराष्ट्र वनकर्मचाऱ्यांनी केलेल्या मारहाणीमुळे झाल्याची तक्रार मयत युवकाच्या आईने धरमपूर पोलिसांत दिली असून, याप्रकरणी सखोल चौकशीची मागणी केली आहे.

काही दिवसांपूर्वी उंबरठाण वनपरिक्षेत्रातील गुही या वनक्षेत्रातून सागवान लाकडाची तस्करी करताना गुजरातमधील धरमपूर तालुक्यातील जागीर येथील नारंदाभाई इंदूभाई गायकवाड (३१) यास गस्तीवर असलेल्या वनकर्मचाऱ्यांनी सागवान लाकडाच्या पीकअपसह पकडले होते. त्यानंतर त्यास वनविभागाने वारंवार नोटीस बजावूनही तो हजर होत नव्हता. त्यामुळे दि.२३ नोव्हेंबर रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास त्याच्या गावी जाऊन त्याला घरातून ताब्यात घेतले होते. दि. २४ नोव्हेंबर रोजी त्यास न्यायालयात हजर केले असता दि. २६ नोव्हेंबरपर्यंत वनकोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर त्याची जामीनावर मुक्तता करण्यात आली. यादरम्यान नारंदाभाईस गंभीर स्वरुपाच्या मारहाणीमुळे खूपच त्रास होऊ लागल्याने दि. २८ नोव्हेंबर रोजी धरमपूर येथे उपचारासाठी दाखल केले होते. प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने त्यास दि. ५ डिसेंबर रोजी बलसाड येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला, अशी तक्रार आई मंगळीबाई गायकवाड यांनी धरमपूर पोलिसांत दाखल केली आहे. मुलाचा मृत्यू वनकर्मचाऱ्यांनी केलेल्या मारहाणीमुळे झाला की अन्य कारणाने झाला याची सखोल चौकशी शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर करून पोलिसांनी न्याय द्यावा, अशी मागणीही त्यांनी तक्रारीत केली आहे.संशयित गायकवाडने तीन दिवसाच्या वनकोठडीत महाराष्ट्र व गुजरात सीमेलगतच्या अनेक संशयितांची नावे सांगितलेली आहेत. त्यांनीच घातपात केला असण्याची शक्यता आहे. ज्या दिवशी संशयितास जामीन मंजूर झाला त्या दिवशी त्याची रितसर वैद्यकीय तपासणी केली होती. वनकोठडीदरम्यान त्याची व्यवस्थित काळजी घेतली आहे. याबाबत न्यायालयाने संशयितास सुनावणीदरम्यान विचारणादेखील केली होती.- संदीप जोपळे, वनपरिक्षेत्र अधिकारी, उंबरठाण

टॅग्स :forestजंगलCrime Newsगुन्हेगारी