पॉलिशच्या बहाण्याने दागिने चोरणाऱ्या संशयितास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2018 00:31 IST2018-12-18T00:30:28+5:302018-12-18T00:31:29+5:30

सोन्याच्या दागिन्यांना पॉलिश करून देण्याच्या बहाण्याने चोरी करणाºया बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा येथील संशयितास शहर गुन्हे शाखेने अटक केली आहे़

The suspect arrested for stealing ornaments with the help of polishing | पॉलिशच्या बहाण्याने दागिने चोरणाऱ्या संशयितास अटक

पॉलिशच्या बहाण्याने दागिने चोरणाऱ्या संशयितास अटक

नाशिक : सोन्याच्या दागिन्यांना पॉलिश करून देण्याच्या बहाण्याने चोरी करणाºया बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा येथील संशयितास शहर गुन्हे शाखेने अटक केली आहे़ कुर्बान अली परवेज अली (४५, रा़ नांदुरा, जि़ बुलढाणा) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव असून त्याने शहरातील तीन गुन्ह्यांची कबुली दिली आहे़  गुन्हे शाखा युनिट एकचे पोलीस निरीक्षक आनंदा वाघ, सहायक पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी यांना दागिन्यांना पॉलीश करण्याच्या बहाण्याने चोरी करणारा संशयित नांदुरा येथील असल्याची माहिती मिळाली होती़ त्यानुसार गुन्हे शाखेचे पथकाने नांदुरा येथून कुर्बान अली यास ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता त्याने गंगापूर, सरकारवाडा व भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीतील तिघांची फसवणूक केल्याची कबुली दिली़ त्याच्याकडून चोरी केलेल्या ३ लाख ४८ हजार ७५० रुपये किमतीचे ११६़२५० ग्रॅम सोन्याची लगड हस्तगत करण्यात आली आहे़ पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार जिवाजी महाले, पोलीस शिपाई विशाल देवरे, राहुल पालखेडे, प्रवीण चव्हाण, स्वप्नील जुंद्रे यांनी ही कारवाई केली़

Web Title: The suspect arrested for stealing ornaments with the help of polishing