चिचोंडी सोसायटी अध्यक्षपदी सूर्यवंशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2019 18:54 IST2019-12-14T18:53:54+5:302019-12-14T18:54:26+5:30
येवला तालुक्यातील चिचोंडी बुद्रुक येथील विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी यशवंत सूर्यवंशी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. साहेबराव मढवई यांनी आवर्तन पद्धतीने अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने सदर पद रिक्त होते.

चिचोंडी बुद्रुक येथील विकास संस्थेच्या अध्यक्षपदी यशवंत सूर्यवंशी यांची बिनविरोध निवड झाली. सत्कार करताना भागवत खराटे, बाबासाहेब शिंदे, साहेबराव मढवई आदींसह ग्रामस्थ.
जळगाव नेऊर : येवला तालुक्यातील चिचोंडी बुद्रुक येथील विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी यशवंत सूर्यवंशी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. साहेबराव मढवई यांनी आवर्तन पद्धतीने अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने सदर पद रिक्त होते.
सहायक निबंधक कार्यालयात अध्यक्ष निवडीसाठी बैठक झाली. संस्थेचे संचालक तथा माजी अध्यक्ष बाबासाहेब शिंदे यांनी अध्यक्षपदासाठी यशवंत सूर्यवंशी यांच्या नावाची सूचना मांडली, तर मोहन पवार यांनी अनुमोदन दिले. सहायक निबंधक एकनाथ पाटील यांनी सूर्यवंशी यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली.
यावेळी संचालक साहेबराव मढवई, राजेंद्र राजगुरु, पद्मा मढवई, सारीका कासलीवाल, विजय सोनवणे, सुरेश मढवई, भागवत खराटे, नामदेव मढवई, साहेबराव खराटे, सरपंच रवींद्र गुंजाळ, सुनील कासलीवाल, बाबासाहेब सूर्यवंशी, दत्तू सूर्यवंशी, तात्याबा सूर्यवंशी, ऋषिकेश मढवई, रमेश मढवई, प्रभाकर सूर्यवंशी, सतीश सूर्यवंशी, बन्सी गुंजाळ, नामदेव मढवई आदी उपस्थित होते. संस्थेचे सचिव संतोष होंडे, जाधव, लिपिक जुगलकिशोर परदेशी, रामा साळवे यांनी सहायक निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले.