आश्चर्यम...! चक्क, शीर नसलेला दुचाकीस्वार अवतरला नाशकातील रस्त्यांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2020 13:53 IST2020-09-03T13:50:19+5:302020-09-03T13:53:06+5:30
शहर वाहतुक शाखेकडून सातत्याने वर्षाच्या बारा महिने हेल्मेट न वापरणाऱ्यांविरुध्द दंडात्मक कारवाई केली जाते. यामाध्यमातून लाखो ते कोट्यवधींचा महसुल शासनाच्या तिजोरीत जमा होतो; मात्र प्रश्न एवढ्यावरच सुटत नाही.

आश्चर्यम...! चक्क, शीर नसलेला दुचाकीस्वार अवतरला नाशकातील रस्त्यांवर
नाशिक : वेळ अकरा वाजेची... स्थळ : द्वारका चौक.... पुणे महामार्गाच्या बाजूने अचानकपणे शीर नसलेला व्यक्ती चक्क दुचाकी चालवित येतो अन् सिग्नलवर थांबतो...यावेळी आजुबाजुला असलेल्या अन्य वाहनचालकांच्या काळजात धस्स झाले... ‘मी हेल्मेट वापरत नाही, मला डोकं नाही’ असे उपरोधिक वाक्य लिहिलेले फलक दुचाकीवर लावलेले वाचून हेल्मेट वापरासंदर्भातील शहर वाहतुक शाखेच्या एका कर्मचाऱ्याकडून केले जाणारे हे अनोखे जनप्रबोधन सध्या शहरात चर्चेचा विषय ठरत आहे.
