सुरगाणा तालुक्यात रविवारी जलपरिषद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 18:20 IST2019-05-30T18:20:06+5:302019-05-30T18:20:58+5:30
नाशिक जिल्हयाच्या पाश्चिमेकडील पेठ व सुरगाणा तालुक्यात मुबलक पाऊस पडूनही ऊन्हाळ्यात जनतेला घोटभर पाण्यासाठी रानोमाळ भटकण्याची वेळ आली असून यावर ठोस उपाययोजना करण्यासाठी आता सामाजिक संस्था व आदिवासी जनतेने कंबर कसली असून त्याचाच एक भाग म्हणून येत्या रविवारी ( २ ) रोजी सुरगाणा तालुक्यातील जाहुले येथे जलपरिषद आयोजित करण्यात आली आहे.

सुरगाणा तालुक्यात रविवारी जलपरिषद
पेठ : नाशिक जिल्हयाच्या पाश्चिमेकडील पेठ व सुरगाणा तालुक्यात मुबलक पाऊस पडूनही ऊन्हाळ्यात जनतेला घोटभर पाण्यासाठी रानोमाळ भटकण्याची वेळ आली असून यावर ठोस उपाययोजना करण्यासाठी आता सामाजिक संस्था व आदिवासी जनतेने कंबर कसली असून त्याचाच एक भाग म्हणून येत्या रविवारी ( २ ) रोजी सुरगाणा तालुक्यातील जाहुले येथे जलपरिषद आयोजित करण्यात आली आहे.
या वर्षी सर्वाधिक दुष्काळाचे चटके पेठ व सुरगाणा या दोन तालुक्यांना बसले. सरासरी इतका पाऊस पडूनही जवळपास सर्वच गावांना मे मिहण्यात पिण्याचे पाणी मिळत नाही. शासकिय योजना राबवल्या जात असल्या तरी योग्य निर्णय व समन्वयाचा अभाव यामुळे अनेक पाणी योजना धुळ खात पडून आहेत. यासाठी स्थानिक जनता, शासनाचे अधिकारी, लोकप्रतिनीधी व सामाजिक संस्थांना एकाच व्यासपिठावर आणून ठोस उपाययोजना तयार करण्यासाठी या जलपरिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. सद्यस्थितीत आदिवासी भागातील सर्वच गावांना पाणीटंचाईने घेरले असून रात्री अपरात्री महिलांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे.
म्हणून या जलपरिषद साठी पालकमंत्री, खासदार, आमदार यांचे सह स्थानिक लोकप्रतिनिधींना निमंत्रित करण्यात आले आहे. पेठ, सुरगाणा व दिंडोरी तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते व ग्रामस्थांनी उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.