शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

आम्हाला मायदेशी परतण्यासाठी सहकार्य करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2020 18:04 IST

रशियातील किर्गीझस्थान विद्यापीठात वैद्यकीय शिक्षणासाठी गेलेल्या महाराष्ट्रातील दोनशे तीन विद्यार्थ्यांना मायदेशी परतण्याची आस लागलेली आहे. आम्हाला मायदेशी परतण्यासाठी सहकार्य करावे, अशी हाक त्यांच्याकडून दिली जात आहे. मात्र मुंबईच्या विमानतळावर विमान उतरण्यासाठी शास्त्रज्ञांकडून परवानगीसाठी विलंब होत असल्याने पालकांचा जीव टांगणीला लागला आहे. दरम्यान, निफाड तालुक्याचे आमदार दिलीप बनकर यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह अन्य मंत्र्यांशी संपर्क साधून या विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

ठळक मुद्देप्रशासनाला हाक : रशियात अडकले २०३ विद्यार्थी, निफाडमधील २२ जणांचा समावेश

पिंपळगाव बसवंत : रशियातील किर्गीझस्थान विद्यापीठात वैद्यकीय शिक्षणासाठी गेलेल्या महाराष्ट्रातील दोनशे तीन विद्यार्थ्यांना मायदेशी परतण्याची आस लागलेली आहे. आम्हाला मायदेशी परतण्यासाठी सहकार्य करावे, अशी हाक त्यांच्याकडून दिली जात आहे. मात्र मुंबईच्या विमानतळावर विमान उतरण्यासाठी शास्त्रज्ञांकडून परवानगीसाठी विलंब होत असल्याने पालकांचा जीव टांगणीला लागला आहे. दरम्यान, निफाड तालुक्याचे आमदार दिलीप बनकर यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह अन्य मंत्र्यांशी संपर्क साधून या विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.किर्गीझस्तान येथे वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यात पिंपळगाव येथील सोनिया विवेक पाटील, तृप्ती उत्तम शिंदे, सिद्धी हेमंत खैरणार, ऋतुराज कैलास शेवकर, अनिकेत सतीश बैरागी यांच्यासह परिसरातील १० विद्यार्थी , तालुक्यातील २२, जिल्ह्यातील ९१ तर संपूर्ण महाराष्ट्रातील २०३ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. कोरोनामुळे जगभरात हवाई सीमा बंद करण्यात आल्या असून संपूर्ण भारतात लॉकडाऊन आहे. त्यामुळे बाहेरून येणा-या प्रवाशांना बंदी घालण्यात आलेली असल्याने हे विद्यार्थी रशियात अडकून पडले आहेत. त्या ठिकाणी त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून त्यांना मायदेशी सुरक्षित आणण्यासाठी त्यांच्या पालकांनी केंद्रीय मंत्र्यापासून राज्य मंत्रीमंडळापर्यंत सर्वांशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. किर्गीझस्थान शहरात अन्नधान्य उपलब्ध होत नसल्याने बाहेरून आयात करावे लागते. परंतु तेदेखील लॉकडाऊन काळात उपलब्ध न झाल्यास त्या विद्यार्थ्याच्या खाण्या-पिण्याचा व आजारी पडल्यास औषधांचा तुटवडा निर्माण होऊन शेकडो विद्यार्थ्यांची गैरसोय होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे लवकरात लवकर त्यांना भारतात आणण्यासाठी पालकांनी सुरेशबाबा पाटील ,आमदार बनकर, माजी आमदार अनिल कदम,सुप्रिया सुळे, निलम गोºहे,आदित्य ठाकरे व रोहित पवार यांच्यामार्फत शासनाना साकडे घातले आहे.१ मे रोजी आम्हाला एम. बी. बी. एस. ची डिग्री मिळणार आहे परंतु याठिकाणी जगणेदेखील मुश्किल झालेले आहे. अन्नाचा मोठा तुटवडा आहे तसेच आजारी पडलेल्या मुलांसाठी औषधेदेखील उपलब्ध नाहीत मग आम्ही जगणार कसे? आमच्या डिग्रीचा काय उपयोग होणार? आम्ही जगलो तर अजून पदव्या मिळू शकतील त्यामुळे आम्हाला लवकरात लवकर मायदेशी परत न्यावे ही विनंती.- कल्पिता रसाळ, विद्यार्थिनीतेथील मुख्य शहर लॉकडाऊन झाल्यामुळे खाण्या-पिण्याची गैरसोय व आरोग्य सुविधाही विद्यार्थ्यांना अपु-या पडत आहेत. त्यांना तातडीने मायदेशी घेऊन येण्यासाठी भारतीय प्रशासनाने व्यवस्था करावी. माझी पुतणी सोनिया पाटील दररोज व्हॉट्सअ‍ॅपद्वारे व्हिडीओ कॉलिंग करून जेवणाचे व तेथील परिस्थितीचे फोटो पाठवून विनवण्या करीत आहे. खूप मोठ्या संकटात ते सध्या आहेत. त्यामुळे शासनाने तातडीने पावले उचलून सहकार्य करणे अपेक्षित आहे.- निलेश पाटील,पालक, पिंपळगाव बसवंत

टॅग्स :NashikनाशिकStudentविद्यार्थी