Sumati Prakashji His arrival in Nashik | सुमतिप्रकाशजी म.सा. यांचे नाशिकनगरीत होणार आगमन

नववर्ष महामंगलिक सोहळादीक्षा आणि महामंगलिक सोहळ्याच्या फलकाचे अनावरण करण्यात आले. याप्रसंगी सकल जैन संघाचे सदस्य.

नाशिक : तपस्वीरत्न सुमतिप्रकाशजी म.सा. वाचनाचार्य उपाध्याय प्रवर विशालमुनीजी म.सा. यांच्यासह अनेक जैन साधू-संतांचे नाशिकनगरीत भागवती दीक्षा व नववर्षा महामंगलिक सोहळ्यानिमित्त दि. ३१ डिसेंबर रोजी आगमन होणार आहे.
या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी सकल जैन श्रीसंघ नाशिक, नवकार ग्रुप नाशिक व नवकार ग्रुप सिडको यांच्या वतीने संपूर्ण जैन समाजाच्या सामाजिक संस्थांचे पदाधिकारी व मान्यवर यांची रविवारी (दि. १०) रोजी समकितमुनीजी म.सा. यांच्या सानिध्यात सकाळी १०.३० वाजता आर. के. स्थानक रविवार कारंजा येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीस उपस्थित राहावे, असे आवाहन सकल श्रीसंघ नाशिक यांच्या वतीने करण्यात आले आहे.

 

Web Title: Sumati Prakashji His arrival in Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.