सातारे येथील सरपंचपदी सुमनबाई शिंदे बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 10:08 PM2021-02-12T22:08:49+5:302021-02-13T00:45:44+5:30

पिंपळगाव लेप : येवला तालुक्यातील सातारेच्या सरपंचपदी सुमनबाई शिंदे यांची, तर उपसरपंचपदी ईश्वर गांगुर्डे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

Sumanbai Shinde unopposed as Sarpanch of Satare | सातारे येथील सरपंचपदी सुमनबाई शिंदे बिनविरोध

सातारे येथील सरपंचपदी सुमनबाई शिंदे बिनविरोध

googlenewsNext

पिंपळगाव लेप : येवला तालुक्यातील सातारेच्या सरपंचपदी सुमनबाई शिंदे यांची, तर उपसरपंचपदी ईश्वर गांगुर्डे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
सरपंच, उपसरपंच निवडीसाठी भारतीय जनता पार्टीचे नेते नवनाथ गांगुर्डे यांच्या अध्यक्षतेखाली व माउली पठारे यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी (दि. १२) दुपारी २ वाजता निवडणूक घेण्यात आली. यात सरपंचपदी सुमनबाई शिंदे तर उपसरपंचपदी ईश्वर गांगुर्डे यांची एकमताने निवड करण्यात आली. याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य रत्नाबाई शिंदे,दिपक गांगुर्डे, मधुकर बहिरम, योगीता साठे, जागृती मखरे व ग्रामस्थ उपस्थित होते. या निवडीनंतर समर्थकांनी गुलालाची उधळण व फटाक्यांची आतिषबाजी करून जल्लोष केला. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी के. वाय. सिध्दीकी, ग्रामसेविका एम. ए. शेख, कृषी सहाय्यक एम. पाटोळे आदींनी कामकाज पाहिले. याप्रसंगी ज्ञानेश्वर पठारे,माउली गचाले, माउली वाघ, भाऊसाहेब गचाले,भाऊसाहेब पठारे,आप्पाभाऊ पठारे, साहेबराव गायकवाड, सूर्यकांत गोसावी,दत्तू दखने,उत्तम दखने, सदाशिव मखरे, लक्ष्मण मखरे, शांताराम पाटील, विठ्ठल गांगुर्डे, सागर पठारे, नवनाथ शिंदे आदी उपस्थित होते.

Web Title: Sumanbai Shinde unopposed as Sarpanch of Satare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक