लोहोणेर येथील युवकाची आत्महत्त्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2019 14:13 IST2019-11-27T14:13:44+5:302019-11-27T14:13:53+5:30
लोहोणेर : - येथील रहिवाशी असलेला व मजुरी करून आपल्या कुटुंबाला हातभार लावणारा अमोल तुकाराम बच्छाव या २५ वर्षीय युवकाने राहत्या घरी मध्यरात्रीच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली.

लोहोणेर येथील युवकाची आत्महत्त्या
लोहोणेर : - येथील रहिवाशी असलेला व मजुरी करून आपल्या कुटुंबाला हातभार लावणारा अमोल तुकाराम बच्छाव या २५ वर्षीय युवकाने राहत्या घरी मध्यरात्रीच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे निश्चित कारण समजू शकले नाही. याबाबत देवळा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या संदर्भात देवळा पोलीस ठाण्याचे वतीने घटनास्थळी पंचनामा करण्यात आला असून देवळा पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक स्वप्नील राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सोनवणे व पवार हे पुढील तपास करीत आहेत. शवविच्छेदना नंतर दुपारी अकरा वाजता शोकाकुल वातावरणात लोहोणेर येथे गिरणातीरी अमोल याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात आई, दोन भाऊ असा परिवार आहे.