उगावला शेतकऱ्याची ्नरेल्वेखाली आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2018 01:00 IST2018-08-11T00:59:55+5:302018-08-11T01:00:24+5:30
निफाड : उगाव येथील शेतकरी रामदास पांडुरंग बिरार यांनी कर्जबाजारी पणाला कंटाळून रेल्वेखाली आत्महत्या केल्याची केली. बिरार यांची दीड एकर शेती आहे

उगावला शेतकऱ्याची ्नरेल्वेखाली आत्महत्या
निफाड : उगाव येथील शेतकरी रामदास पांडुरंग बिरार यांनी कर्जबाजारी पणाला कंटाळून रेल्वेखाली आत्महत्या केल्याची केली. बिरार यांची दीड एकर शेती आहे.
त्यांनी शेतीसाठी विविध बँकांचे पाच लाख ८५ हजारांचे कर्ज व उसनवारीने दीड लाख रुपये घेतले होते. वसुलीसंदर्भात नोटिसा येऊ लागल्याने ते नैराश्येत गेले. नैराश्येतून त्यांनी गुरुवारी (दि. ९) शिवडी शिवारात आत्महत्या केली. कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या करत आहे, अशा मजकुराची चिठ्ठी त्यांच्याकडे आढळून आली.
निफाड येथील उपजिल्हा
रुग्णालयात शुक्र वारी उत्तरीय तपासणी केल्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. उगाव येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.