नगरसुल : येवला तालुक्यातील रेंडाळे येथील एका शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.येथील शेतकरी अशोक आनंदा लांडे (५५) यांनी मंगळवारी (दि.२) स्वतःच्या शेतात बाभळीच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. सकाळी येथील रस्त्यावरून जाणाऱ्या रहिवाशांच्या हा प्रकार लक्षात आला आणि ही वार्ता गावभर पसरली. नगरसूल पोलिसांनाही घडलेल्या प्रकाराची माहिती देण्यात आली.पोलीस उपनिरीक्षक एम. के. सुरासे यांनी घटनास्थळी येऊन घटनेची माहिती घेतली. शवविच्छेदनासाठी मृतदेह येवल्याच्या उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. आत्महत्या ग्रस्त शेतकरी अशोक लांडे यांना पत्नी, दोन मुले, मुलगी असा परिवार आहे. दरम्यान, लांडे यांच्यावर बँकेचे तीन ते चार लाख कर्ज असून ते भरण्यासाठी बँकेकडून वारंवार तगादा सुरू होता. बँकेचे अधिकारी सतत फोन करून कर्ज भरण्यासाठी तगादा लावत होते. त्यामुळेच लांडे यांनी टोकाचे पाऊल उचलले असा आरोप नातेवाईक व येथील रहिवाशांनी केला आहे.
रेंडाळा येथील शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2021 20:21 IST
नगरसुल : येवला तालुक्यातील रेंडाळे येथील एका शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. येथील शेतकरी अशोक आनंदा लांडे (५५) यांनी मंगळवारी (दि.२) स्वतःच्या शेतात बाभळीच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. सकाळी येथील रस्त्यावरून जाणाऱ्या रहिवाशांच्या हा प्रकार लक्षात आला आणि ही वार्ता गावभर पसरली. नगरसूल पोलिसांनाही घडलेल्या प्रकाराची माहिती देण्यात आली.
रेंडाळा येथील शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या
ठळक मुद्देबँकेच्या तगाद्यामुळे त्रस्त होऊन शेतकऱ्याने उचलले पाऊल