सेवानिवृत्त लष्करी जवानाची राहत्या घरी आत्महत्त्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2018 11:00 PM2018-03-05T23:00:04+5:302018-03-05T23:00:04+5:30

Suicide at the residence of a retired army officer | सेवानिवृत्त लष्करी जवानाची राहत्या घरी आत्महत्त्या

सेवानिवृत्त लष्करी जवानाची राहत्या घरी आत्महत्त्या

Next
ठळक मुद्दे१२-बोअर रायफलद्वारे त्यांनी गोळी झाडल्याचे स्पष्ट घराच्या अंगणात स्वत:वर गोळी झाडून घेत आत्महत्त्या

नाशिकरोड : वडनेर गावात राहणा-या एका सेवानिवृत्त लष्करी जवानाने राहत्या घरी सोमवारी (दि.५) रात्रीच्या सुमारास रायफलने गोळी झाडून आत्महत्त्या केल्याची घटना घडली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संतोषकुमार महेश्वर चौधरी (४२) हे कुटुंबासमवेत वडनेर येथे राहत होते. ते लष्करीसेवेतून २०१२ साली निवृत्त झाले होते त्यांच्या वडीलांच्या नावावर मात्र नंतर संतोषकुमार यांच्या नावावर असलेली १२-बोअर रायफलद्वारे त्यांनी गोळी झाडल्याचे स्पष्ट झाले. या रायफलने त्यांनी राहत्या घराच्या अंगणात स्वत:वर गोळी झाडून घेत आत्महत्त्या केली. आत्महत्त्येपुर्वी त्यांनी चिठ्ठी लिहून मृत्यूस कोणीही जबाबदार नसल्याचे व त्यांची कोणाविषयी तक्रार नसल्याचे नमुद केल्याची माहिती उपनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक प्रभाकर रायते यांनी दिली. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीस उपआयुक्त श्रीकृष्ण कोकाटे हेदेखील घटनास्थळी पोहचले. चौधरी यांच्या मृतदेहाचा पंचनामा करत पोलिसांनी शवविच्छेदनासाठी मृतदेह जिल्हा शासकिय रुग्णालयात हलविला. आत्महत्त्येमागील निश्चित कारण चिठ्ठीमधून स्पष्ट होऊ शकलेले नाही. घरातील सर्व कुटुंबिय लग्नासाठी बाहेरगावी गेले असता त्यांनी बोअर रायफलद्वारे गोळी झाडून घेत आत्महत्त्या केली असे उपआयुक्त कोकाटे यांनी सांगितले.

 

Web Title: Suicide at the residence of a retired army officer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.