अल्पवयीन मुलीची राहत्या घरी आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2021 01:36 IST2021-08-05T01:36:19+5:302021-08-05T01:36:48+5:30
विहितगाव सिग्नलजवळ राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीने राहत्या घरी ओढणी बांधून गळफास घेत आत्महत्या केली.

अल्पवयीन मुलीची राहत्या घरी आत्महत्या
नाशिकरोड : विहितगाव सिग्नलजवळ राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीने राहत्या घरी ओढणी बांधून गळफास घेत आत्महत्या केली. साक्षी संजय धोंगडे हिने मंगळवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी छताच्या पाईपाला ओढणी बांधून गळफास घेतला. तिच्या आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. तिच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.