आनंदवलीत एकाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2020 01:21 IST2020-09-20T01:21:15+5:302020-09-20T01:21:42+5:30

आनंदवली येथील माळीवाड्यातील ४० वर्षीय व्यक्तीने राहत्या घरात गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना शनिवारी पहाटे उघडकीस आली.

Suicide of one in Anandavali | आनंदवलीत एकाची आत्महत्या

आनंदवलीत एकाची आत्महत्या

नाशिक : आनंदवली येथील माळीवाड्यातील ४० वर्षीय व्यक्तीने राहत्या घरात गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना शनिवारी पहाटे उघडकीस आली. किशोर बाळू जाधव (रा.माळीवाडा) असे या व्यक्तीचे नाव आहे. किशोर जाधव यांनी शुक्रवारी (दि.१८) रात्री राहत्या घरात छताच्या लोखंडी पाइपाला दोरी बांधून गळफास लावून घेतला. शनिवारी पहाटेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.
एकाच रात्री दोन स्कार्पिओ चोरीला
नाशिक : शहरात वाहनचोरीचे सत्र सुरू असून, चोरट्यांनी महागडी वाहनांकडे आपला मोर्चा वळवला आहे. गंगापूररोड परिसरातील वेगवेगळ्या ठिकाणाहून एकाच रात्री दोन स्कार्पिओ चोरीस गेल्याची घटना घडली आहे. महेंद्रा गेस्टहाऊस भागात राहणारे हेमंतकुमार परमेश यांनी घरासमोर पार्क केलेली स्कार्पिओ चोरट्यांनी पळवून नेली. सुलभा अरुण धमाले यांच्या मालकीची स्कार्पिओ चोरट्यांनी चोरून नेली.

Web Title: Suicide of one in Anandavali