पिंपळगावी आगीत ऊस खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2019 18:27 IST2019-01-01T18:26:38+5:302019-01-01T18:27:39+5:30
पिंपळगाव बसवंत परिसरात शॉर्टसर्किटमुळे उसाला आग लागल्याची घटना सोमवारी घडली. या आगीत सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र, येथील शेतकरी अशोक त्र्यंबक शिंदे यांच्या शेतातील ऊस जळून खाक झाल्याने आर्थिक नुकसान झाले आहे.

पिंपळगावी आगीत ऊस खाक
पिंपळगाव बसवंत : परिसरात शॉर्टसर्किटमुळे उसाला आग लागल्याची घटना सोमवारी घडली. या आगीत सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र, येथील शेतकरी अशोक त्र्यंबक शिंदे यांच्या शेतातील ऊस जळून खाक झाल्याने आर्थिक नुकसान झाले आहे.
वारंवार विद्युततारेच्या समस्यांबाबत पिकाला आग लागण्याच्या घटनेत वाढ होत आहे. तरीदेखील विद्युत वितरण विभाग कोणतीही अंबलबजावणी करत नसल्याने त्याचा परिणाम शेतकºयांच्या पिकांवर होत आहे.
पिंपळगाव बसवंत शिवारातील नाफेड येथे गट नंबर ४५५/१ मधील उसाला आग लागली. आग विझवण्यासाठी तातडीने पिंपळगाव व एचएल अग्निशामक दलास पाचारण करण्यात आले. दीड तासाच्या अथक प्रयत्नांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. मात्र आगीत ऊस पूर्णपणे जळाल्याने शेतकºयाचे आर्थिक नुसकान झाले आहे. यावर महावितरण विभाग योग्य दखल घेईल की नाही हे सांगणे अवघड आहे.