शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
3
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
4
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
5
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
6
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
7
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
8
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
9
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
10
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
11
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
12
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
13
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
14
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
15
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
16
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
17
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
18
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
19
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
20
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
Daily Top 2Weekly Top 5

साखरेचा तिढा सुटला!

By admin | Updated: July 29, 2014 00:53 IST

सणासुदीचा दिलासा : चार दिवसांत उपलब्ध

नाशिक : जवळपास आठ महिन्यांपासून रेशनमधून गायब झालेली साखर आता पुन्हा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून, जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी अलायन्स ट्रेडर्स या मुंबईस्थित कंपनीशी करार केल्याने यापुढे सणासुदीत गोरगरिबांना गोडधोड करून खाता येणार आहे. येत्या चार दिवसांत मुंबईहून साखर थेट तालुक्याच्या धान्य गुदामात पोहोचेल व त्याचे तातडीने रेशनमधून वाटप करण्याच्या सूचना जिल्हा पुरवठा अधिकारी ज्ञानेश्वर जवंजाळ यांनी दिल्या आहेत. लेव्हीची साखर देण्यास कारखाने टाळाटाळ करीत असल्याने आठ महिन्यांपासून साखरेचा तिढा निर्माण झाला होता. सरकार साखरेचा कोटा मंजूर करीत असले, तरी कारखाने साखर नसल्याची सबब पुढे करून साखरच देत नसल्याने शासनाचे आदेश कागदोपत्रीच ठरले. त्यानंतर शासनाने खुल्या बाजारातून साखर खरेदी करून ती रेशनवर उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला होता. व त्यासाठी जिल्हा पातळीवरच निविदा मागविण्यात आल्या. परंतु या निविदांमधील अटी-शर्तींची पूर्तता करू शकणारा एकही ठेकेदार पुढे न आल्याने शिधापत्रिकाधारकांना साखर उपलब्ध होऊ शकली नाही. दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचा अडसर निर्माण झाल्यामुळे हा प्रश्न लोंबळकत पडला. आता मात्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शासकीय पातळीवर सूत्रे फिरून शासनाने नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये नोंदणीकृत असलेल्या व्यापाऱ्यांकडून साखर खरेदी करण्याचा निर्णय घेतला. नाशिक जिल्ह्यातील दारिद्र्यरेषेखालील कुटुंबे, अन्नपूर्णा व अंत्योदय योजनेच्या लाभार्थींसाठी सुमारे १०,५८१ क्विंटल साखर मंजूर करण्यात आली.