शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखपदी सुधाकर बडगुजर, महानगर प्रमुखपदी विलास शिंदे

By संजय पाठक | Published: February 26, 2024 10:53 AM2024-02-26T10:53:19+5:302024-02-26T10:53:49+5:30

शिवसेनेच्या वतीने आज या पदांची घोषणा करण्यात आली.

sudhakar badgujar as district chief of shiv sena and vilas shinde as mahanagar chief | शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखपदी सुधाकर बडगुजर, महानगर प्रमुखपदी विलास शिंदे

शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखपदी सुधाकर बडगुजर, महानगर प्रमुखपदी विलास शिंदे

संजय पाठक, नाशिक: शिवसेनेच्या ठाकरे गटात संघटनात्मक मोठे फेरबदल करण्यात आले असून जिल्हाप्रमुखपदी सुधाकर बडगुजर तर महानगर प्रमुखपदी विलास शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

शिवसेनेच्या ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांना लोकसभा निवडणुकीसाठी दावेदारी आहे. मुळात राज्यात महाविकास आघाडी सरकार असताना राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या यादी मध्ये विजय  करंजकर यांचे नाव होते. मात्र, त्यांना हे पद मिळू शकले नव्हते. त्यानंतर आता लोकसभेच्या उमेदवारीसाठी त्यांच्या नावाची चर्चा असून त्या पार्श्वभूमीवर त्यांना जिल्हा प्रमुख पदावरून मुक्त करून आता महानगरप्रमुख असलेल्या सुधाकर बडगुजर यांना पदोन्नती देऊन जिल्हाप्रमुख करण्यात आले आहे. नाशिक महापालिकेतील माजी गटनेते विलास शिंदे यांना महानगरप्रमुखपदी नियुक्त करण्यात आले आहे. शिवसेनेच्या वतीने आज या पदांची घोषणा करण्यात आली.

Web Title: sudhakar badgujar as district chief of shiv sena and vilas shinde as mahanagar chief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.