शिरूर तांगडीच्या तरुणाचा अचानक मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 21:06 IST2021-03-20T21:06:06+5:302021-03-20T21:06:49+5:30
चांदवड : तालुक्यातील शिरूर तांगडी येथील तरुणाचा छातीत कळ निघाल्याने मृत्यू झाला.

अशोक आहेर
ठळक मुद्दे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू
चांदवड : तालुक्यातील शिरूर तांगडी येथील तरुणाचा छातीत कळ निघाल्याने मृत्यू झाला.
अशोक आहेर (३६) हा तरुण कामानिमित्त रस्त्याने चालत असताना गावातील मारुती मंदिरासमोर अचानक त्यांच्या छातीत तीव्र कळ आली. त्यामुळे तो जमीनीवर कोसळला त्यास तातडीने पिंपळगाव बसवंत येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या संदर्भात अकस्मित मृत्युची नोंद करण्यात आली आहे.