शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णालयाच्या बिलांची अचानक तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2020 18:49 IST

नाशिक : शहरातील रुग्णालयांत कोरोना उपचाराबाबत शासनाच्या निर्देशानुसारच दर आकारले जावे यासाठी संबंधित रुग्णालयांना आता दरपत्रक आणि बेडची स्थितीची ...

ठळक मुद्देमनपाची कार्यवाही दरपत्रक रुग्णालयांबाहेर लावणे सक्तीचे

नाशिक : शहरातील रुग्णालयांत कोरोना उपचाराबाबत शासनाच्या निर्देशानुसारच दर आकारले जावे यासाठी संबंधित रुग्णालयांना आता दरपत्रक आणि बेडची स्थितीची माहिती दर्शनी भागात लावणे सक्तीचे करण्यात आले आहे. महापालिकेने यासंदर्भात पत्रक जारी केले आहे. याशिवाय सर्वच रुग्णालयाांत भेट देऊन मनपाचे कर्मचारी दररोज १० ते २० बिले ताब्यात घेऊन त्याची तपासणी करीत आहेत.शहरात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून, अनेक नागरिक खासगी रुग्णालयात उपचारदेखील घेत आहेत. तथापि, काही रुग्णालये जादा दर आकारणी करीत असल्याच्या तक्रारी आहेत. त्याची दखल घेऊन महापालिकेने पथक नियुक्त केले आहे. त्याचप्रमाणे शासनाने खासगी रुग्णालयांचे उपचार शुल्क निश्चित केले आहेत. चार हजार, साडेसात हजार आणि नऊ हजार असे हे शुल्क असून, ते अगोदरच घोषित करण्यात आले आहेत. याशिवाय कोरोनाची चाचणी करणाऱ्या खासगी प्रयोगशाळांनादेखील दर निश्चित करून देण्यात आले आहेत.नागरिकांना उपचाराचे शुल्क कळावे आणि रुग्णालयात किती बेड रिक्त आहेत याची तेथे गेल्यानंतर तत्काळ माहिती मिळावी यासाठी रुग्णालयांच्या दर्शनी भागातच दर फलक लावण्याची सक्ती करण्यात आली असून, तसे निर्देश महापालिकेने रुग्णालयांना दिल्याची माहिती महापालिकेचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेंद्र त्र्यंबके यांनी दिली. शहरातील सर्व रुग्णालयांतील दररोजच बिले तपासली जात आहे. या बिलांची तपासणी करून संबंधित रुग्णालांचीदेखील चौकशी केली जाणार आहे.दरम्यान, प्रहार संघटनेचे दत्तू बोडके यांनी शहरातील तीन रुग्णालयांमध्ये बेड््सची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी केलेल्या दूरध्वनीवर अत्यंत टाळाटाळ करण्यात आल्याचा अनुभव आल्याची तक्रार केली आहे. महापालिकेच्या वतीने बेड््सची माहिती आॅनलाइन उपलब्ध करून देण्यात आली असली तरी काही रुग्णालयांनी त्यासंदर्भात टाळाटाळ केल्याची तक्रार त्यांनी केली आहे. त्या अनुषंगाने महापालिकेने संबंधित दूरध्वनी क्रमांक घेऊन माहिती घेण्यास सुरुवात केली आहे. महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार रूटीन वॉर्ड आयसोलिशनसाठी चार हजार रुपये, आयसीयू वॉर्डासाठी साडेसात हजार रुपये तर अतिदक्षता विभागात रुग्णाला व्हेंटिलेटर वापरावा लागल्यास नऊ हजार रुपये दर निश्चित करण्यात आला आहे. यात वैद्यकीय तपासणी शुल्क, सर्व प्रकाराच्या चाचण्या आणि नर्सिंग चार्जेससह रुग्णाच्या नाश्त्याच्या तसेच भोजनाच्या खर्चाचादेखील समावेश आहे.

टॅग्स :NashikनाशिकHealthआरोग्य