शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
3
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
4
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
5
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
6
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
7
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
8
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
9
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
10
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
11
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
12
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
13
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
14
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
15
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
16
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
17
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
18
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
20
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा

दुर्मीळ गिधाडांचे यशस्वी संवर्धन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 00:19 IST

जगाच्या पाठीवरून नामशेष होऊ पाहणाऱ्या व धोकादायक स्थितीत असलेल्या दुर्मीळ गिधाडांचे संवर्धन नाशिकमध्ये यशस्वीरीत्या केले जात आहेत. लांब चोचीचे व पांढºया पाठीची शेकडो गिधाडे जिल्ह्यातील आदिवासी भागात आढळून येतात.

नाशिक : जगाच्या पाठीवरून नामशेष होऊ पाहणाऱ्या व धोकादायक स्थितीत असलेल्या दुर्मीळ गिधाडांचे संवर्धन नाशिकमध्ये यशस्वीरीत्या केले जात आहेत. लांब चोचीचे व पांढºया पाठीची शेकडो गिधाडे जिल्ह्यातील आदिवासी भागात आढळून येतात. हरसूलजवळ खोरीपाड्यामधील आदिवासींनी वनविभागाच्या सहकार्याने गिधाडांसाठी ‘भोजनालय’ चालविण्याचा आगळावेगळा उपक्रम मागील आठ वर्षांपासून हाती घेतला आहे. याद्वारे गिधाडांचे यशस्वीपणे संवर्धन केले जात आहे.निसर्गातील सफाई कामगाराची भूमिका गिधाडे बजावतात. अन्नसाखळीमधील हा पक्षी महत्वाचा दुवा मानला जातो. भारतात एकेकाळी गिधाडांची संख्या चांगली होती; परंतु गेल्या काही वर्षात त्यांची संख्या झपाट्याने कमी झाली. ती इतकी कमी झाली की आता गिधाडे भारतातून नामशेष होण्याची भीती निर्माण झाली आहे. भारतात पाळीव प्राण्यांची संख्या भरपूर असल्याने त्यांचे खाद्य कमीही झालेले नाही. गिधाडांना मुख्य फटका बसला आहे तो डायक्लोफिनॅकसारख्या औषधांचा जनावरांच्या उपचाराकरिता होणाºया अतीवापरामुळेच.नाशिकपासून अवघ्या ५० किलोमीटरवर त्र्यंबकेश्वर तालुक्यात हरसूलजवळ असलेल्या खोरीपाड्याने गिधाडांच्या संवर्धनासाठी मागील सात वर्षांपासून प्रयत्न सुरू ठेवले आहेत. गिधाडे नसतील तर आजूबाजूला टाकले जाणारे जनावरांचे मृतदेह सडून रोगराई पसरण्याचा धोका निर्माण होईल, म्हणून गिधाडांना वाचवले गेले पाहिजे, असे प्रबोधन वनविभागाकडून करण्यात आले. त्याचे महत्त्व येथील आदिवासींना पटवून देण्यात वनविभागाला यश आले. खोरीपाड्याच्या डोंगराच्या पायथ्याशी नाशिक पश्चिम वनविभागाकडून २०१२ साली गिधाडांसाठी ‘रेस्तरां’ उभारला गेला. येथील मोकळ्या भुखंडाभोवती संरक्षक जाळीचे कुपंण करुन त्या कुंपणामध्ये मृत्यूमुखी पडलेली जनावरे वैद्यकिय तपासणीनंतर टाकण्यास आदिवासींनी सुरूवात केली. पहिल्या दोन वर्षांमध्ये या अनोख्या अशा प्रकल्पाला चांगलेच यश आले. सुमारे पन्नास ते साठ गिधाडे यावेळी येथे भूक भागविण्यासाठी आल्याची पहिली नोंद हरसूलच्या वनधिकाºयांनी केली. हा आकडा आता शेकडोंच्या घरात जाऊन पोहचल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी संदीप पाटील यांनीसांगितले. सुरूवातीला केवळलांब चोचीची गिधाडे येथे वास्तव्यास होती; मात्र मागील तीन वर्षांपासून पांढºया पाठीची गिधाडेदेखील येथे आढळून येत असल्याचे पाटील यांनी सांगितले.‘गिधाड सुरक्षित क्षेत्र’चा विशेष प्रकल्पनाशिक पश्चिम वनविभागाकडून ‘गिधाड सुरक्षित क्षेत्र’ विकसीत करण्याचा प्रस्ताव तयार करुन नागपूर येथे प्रधान वनसंरक्षक कार्यालयाला पाठविण्यात आला आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंजनेरी हा केंद्रबिंदू ठरविण्यात आला आहे. येथून पुढे चारही दिशांमध्ये १०० किलोमीटरच्या क्षेत्रात गिधाडांचा अधिवास असून खोरीपाडा गिधाड भोजनालयदेखील याअंतर्गत येते. यासंपुर्ण परिसरात बॉम्बे नेचर हिस्ट्री सोसायटीच्या (बीएनएचएस) माध्यमातून सुक्ष्म अभ्यास केला जाणार आहे. हा संपुर्ण परिसर ‘गिधाड सुरक्षित क्षेत्र’ म्हणून घोषित केला जाणार आहे. यासाठी २६० दिवसांमध्ये सर्वेक्षण पूर्ण करावयाचे असून त्यासाठी सुमारे ९० हजारांचा खर्च प्रस्तावित आहे. एकूण दोन कोटींचा हा प्रकल्प पाच वर्षांत सुमारे सहा टप्प्यांत पूर्ण केला जाणार आहे. वनविभागाला अद्याप दहा लाखांचा निधी मंत्रालयाकडून प्राप्त झाला आहे. पहिल्या टप्प्यात ७२ लाखांच्या निधीला मंजुरी दिली गेली आहे. हा प्रकल्प उपग्रह टेलिमेटरीद्वारे राबविला जाणार आहे.दोन्ही प्रजातींचे वास्तव्यखोरीपाडा गिधाड भोजनालयामुळे या भागात गिधाडांचे दमदार संवर्धन होण्यास मदत होत आहे. सुरूवातीला या भागात लांब चोचीची गिधाडे आढळून आली. त्यानंतर अवघ्या तीन वर्षांमध्ये पांढºया पाठीची गिधाडेदेखील येथे वास्तव्यास आली. दोन्ही प्रजातींच्या गिधाडांचे संवर्धन येथे होताना दिसून येत आहे. गिधाडांची संख्या शेकडोने वाढली आहे. येथील डोंगरांवर तसेच झाडांवर गिधाडांचा अधिवास तयार झाला आहे.

टॅग्स :Nashikनाशिक