शहरं
Join us  
Trending Stories
1
‘थलपती’ बनला मुख्यमंत्री! विजय यांनी घेतली तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
2
मोठी कारवाई! ग्वाल्हेरमध्ये पाकिस्तानी सायबर नेटवर्कचा पर्दाफाश; हॉटेलमधून ४ एजंटना अटक
3
ममतेचे जिवंत उदाहरण, लेकाच्या जीवासाठी माऊलीची तळमळ; किडनीच्या रूपाने पुन्हा देणार जन्म
4
१७ वर्षांपूर्वीची सिक्रेट भेट, एक फोन कॉल अन्..., राहुल-विजयच्या मैत्रीने असं जुळलं तामिळनाडूचं सत्तासमीकरण
5
नवं समीकरण! डिजिटल वॉरियर्स, डॉक्टर्स अन् युवा चेहरे; टीम विजय यांच्या कॅबिनेटमध्ये कुणाला संधी?
6
...तर १६ ऑगस्टपासून 'त्या' रिक्षाचालकांवर कारवाई करणं अटळ; परिवहन मंत्र्‍यांनी पुन्हा बजावलं
7
लग्नाच्या वाढदिवशीच गरोदर महिलेची हत्या; हुंड्यात 'बुलेट' न मिळाल्याने सासरच्यांनी घेतला जीव
8
‘पालखी निघाली राजाची…’, लालबागच्या राजावरील लोकप्रिय गीताचे संगीतकार नितीन मोरजकर यांचं निधन
9
"रशिया-युक्रेन युद्ध अखेरच्या टप्प्यात.."; पुतिन यांचे संकेत, ३ दिवसांच्या युद्धविरामाची घोषणा
10
टीसीएस' प्रकरण: निदा खानसोबत 'स्पॉट पंचनामा', नाशिक पोलिस आयुक्तालयात कुटुंबीयांचीही चौकशी
11
अवघ्या २९ वर्षाची किर्तना तामिळनाडूत बनणार मंत्री; थलापती विजय यांच्यासोबत आज घेणार शपथ
12
आजचे राशीभविष्य, १० मे २०२६: 'या' २ राशीच्या लोकांनी रागावर नियंत्रण ठेवा, अचानक खर्च होईल पैसा
13
ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण संतापल्या, प्रशासनाला दिला अल्टिमेटम; पुण्यात नेमकं काय घडलं प्रकरण?
14
'आधार'मधील बायोमेट्रिक 'त्रुटीभार' नागरिकांवर नको; मुंबई उच्च न्यायालयाने दिले 'यूआयडीएआय'ला निर्देश
15
हरयाणा ते बंगाल : मोदींच्या नेतृत्वात ९ राज्यांत भाजपाचे मुख्यमंत्री; अस्तित्व नसलेल्या राज्यांत रोवले भक्कम पाय
16
बोगस दिव्यांग कर्मचाऱ्यांवर उच्च न्यायालयाचा बडगा! राज्यात १२० दिवसांत पडताळणी अनिवार्य
17
विशेष लेख: विरोधी पक्ष दिसला तर लाखाचे बक्षीस द्यायचे का?
18
९४ हजार विद्यार्थ्यी मराठी विषयात नापास, अभिजात दर्जा मिळालेल्या मराठीत अपयश ही धोक्याची घंटा
19
प्रिमियम एफएसआयला सुप्रीम कोर्टाची स्थगिती, शेतकऱ्यांना 'टीडीआर'च्या माध्यमातून दिलासा
20
रशिया-युक्रेनमध्ये ३ दिवसांचा युद्धविराम; ट्रम्प यांच्या मध्यस्थीला यश, १ हजार कैद्यांची अदलाबदल
Daily Top 2Weekly Top 5

राज्यस्तरीय क्र ीडा स्पर्धेत यश

By admin | Updated: January 14, 2017 00:27 IST

सुरगाणा : आश्रमशाळेतील खेळाडूंनी पटकावली १०८ पदके

सुरगाणा : कोकमठाण (जि. नगर) येथे नुकत्याच पार पडलेल्या शासकीय व अनुदानित आश्रमशाळांच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत नाशिक विभागातून कळवण प्रकल्पांतर्गत तालुक्यातील आदर्श समता शिक्षण प्रसारक मंडळ, अलंगुण या शिक्षण संस्थेच्या आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक कामगिरी करून १२८ पदके पटकावली.
राज्याच्या आदिवासी विकास विभागाच्या वतीने या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन नगर जिल्ह्यातील कोपरगाजवळील कोकमठाण येथील जंगलीदास महाराज ट्रस्ट याठिकाणी करण्यात आले होते. या स्पर्धेत विविध ठिकाणच्या आश्रमशाळांनी सहभाग घेतला. यामध्ये तालुक्यातील
आदर्श समता शिक्षण प्रसारक मंडळ, अलंगुण या शिक्षण संस्थेतील अलंगुण, चिंचला, श्रीभुवन, भेगू, सावरपाडा, खिर्डी येथील आश्रमशाळेतील ५२ मुले व ५३ मुली असे १०५ विद्यार्थी सहभागी झाले होते. या विद्यार्थी खेळाडूंनी स्पर्धेत नेत्रदीपक कामगिरी करून ८२ सुवर्ण, २३ रजत व २३ कांस्य  अशी एकूण १२८ पदके पटकावून उपस्थित सर्वांची वाहवा मिळविली.
याप्रसंगी आमदार गावित यांनी क्रीडाशिक्षकांचे योग्य मार्गदर्शन, विद्यार्थ्यांचे कार्य, त्यांचे श्रम व केलेल्या मेहनतीचे हे फळ असून,
हा मोठा गौरव असल्याचे सांगितले. नववर्ष संस्थेसाठी सुवर्ण वर्ष
म्हणून मानले जाईल, असेही ते म्हणाले. (वार्ताहर)