महाराजस्व अभियान जानोरीत यशस्वी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2020 00:47 IST2020-11-11T22:20:33+5:302020-11-12T00:47:00+5:30
जानोरी : महाराजस्व अभियान योजनेअंतर्गत जानोरी गावातील बण रस्ता ते ओझर शिवार रस्ता अनेक दिवसांपासून वादात होता. परंतु तलाठी व ग्रामपंचायतीच्या सहकार्याने आज सर्व शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करून सर्वांच्या सहमतीने उद्घाटन करून रस्त्याचे काम सुरू केल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केला जात आहे.

महाराजस्व अभियान शासन परिपत्रकानुसार महाराष्ट्र राज्यस्व अभियान २०२० शासन परिपत्रकानुसार गाव नकाशाप्रमाणे अतिक्रमण बंद झालेले पानंद, पांधन, शेतरस्ते, शिवार, शिवरस्ते मोकळे करण्याबाबत उपविभागीय अधिकारी दिंडोरी संदीप आहेर, तहसीलदार पंकज पवार यांनी तालुक्यातील तलाठी यांची सभा घेऊन तालुक्यातील बंद पडलेले रस्ते तसेच अडचणीच्या रस्त्याचा मार्ग मोकळा करणेबाबत सूचना दिल्या होत्या.
त्यानुसार जानोरी येथील तलाठी भोये, पोलीसपाटील सुरेश घुमरे, माजी जिल्हा परिषद सदस्य शंकर काठे, उपसरपंच गणेश तिडके. ग्रामपंचायत सदस्य शंकर वाघ, अशोक केंग तसेच शेतकरीवर्ग यांच्या उपस्थितीत जानोरी येथील बण रस्ता ते ओझर शिवार रस्त्यात येणाऱ्या शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करून रस्त्याचे अतिक्रमण काढून रस्त्याचे काम सुरू केले आहे.
हा रस्ता आमदार नरहरी झिरवाळ यांच्या निधीतून डांबरीकरण करण्यात येणार आहे. यावेळी गोरख घुमरे, सतीश घुमरे, निवृत्ती घुमरे, विनोद काठे, विलास काठे, बाळू घुमरे, विष्णू शेटे, शिवाजी घुमरे, शरद घुमरे, उत्तम घुमरे, यादव विधाते आदी शेतकरी उपस्थित होते.