मैदानी स्पर्धांमध्ये अहेर आश्रमशाळेचे यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 18:27 IST2018-10-30T18:27:11+5:302018-10-30T18:27:39+5:30
देवळा तालुक्यातील विठेवाडी येथील डॉ.दौलतराव अहेर अनुदानित आश्रमशाळेतील १४ व १७ वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांनी कळवण प्रकल्पस्तरीय मैदानी क्र ीडा स्पर्धेत घवघवीत यश संपादित केले.

विठेवाडी येथील अहेर अनुदानित आश्रमशाळेतील क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय यश मिळवणारे स्पर्धक व शिक्षक.
लोहोणेर : देवळा तालुक्यातील विठेवाडी येथील डॉ.दौलतराव अहेर अनुदानित आश्रमशाळेतील १४ व १७ वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांनी कळवण प्रकल्पस्तरीय मैदानी क्र ीडा स्पर्धेत घवघवीत यश संपादित केले. १७ वर्षे वयोगटात १५०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत नंदू खिलारी हा विद्यार्थी प्रथम आला तर ८०० मी. धावण्यात मुलींमध्ये मनीषा पवार व मुलांमध्ये अशोक सोनवणे यांनी प्रथम क्र मांक पटकावला. याशिवाय १४ वर्षे गटात ४ बाय १०० या रिलेच्या स्पर्धेतही या शाळेच्या मुलांनी अजिंक्यपद मिळवले तर मुलींचा संघ द्वितीय आला. दिनेश चौरे व विकास चौरे हे दोघे अनुक्र मे ६०० व १५०० मी. च्या स्पर्धेत द्वितीय आले. या स्पर्धकांची पुढील क्र ीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक ज्योस्ना सूर्यवंशी, पुष्पा देवरे, क्र ीडाशिक्षक वाय.एच. आहिरे, वाय. पी. चौरे, कचवे यांचे मार्गदर्शन लाभले.