शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
3
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
4
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
5
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
6
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
7
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
8
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
9
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
10
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
11
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
12
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
13
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
14
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
15
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
16
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
17
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
18
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
19
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
20
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
Daily Top 2Weekly Top 5

समाज माध्यमांच्या आधीन

By admin | Updated: October 11, 2015 00:07 IST

दिनकर गांगल : ज्ञानाचा उत्सव उपक्रम

 नाशिक : वडीलधारी मंडळी आणि तरुण पिढी यांच्यामध्ये दिवसेंदिवस दरी वाढत चालली आहे. सुसंवाद खुंटत असून, माध्यमांच्या आवेगामुळे समाज त्यांच्या आधीन होत आहे, असे प्रतिपादन दिनकर गांगल यांनी केले.ज्योती स्टोअर्स व शंकराचार्य सांस्कृतिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ज्ञानाचा उत्सव लेखक तुमच्या भेटीला या व्याखानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. गंगापूररोडवरील शंकराचार्य न्यास संकुलात शनिवारी (दि.१०) तिसरे पुष्प गांगल यांनी ‘माध्यमांचा गलबला आणि संस्कृतीचा कळवळा’ विषयावर गुंफले. यावेळी ते म्हणाले, मेंदूची गती माध्यमांच्या आवेगामुळे कमी होत चालली आहे. आजची भावी पिढी जेव्हा तरुण होईल, तेव्हा त्यांच्या मनातील सांस्कृतिक चित्र कसे असेल, याची कल्पना करणे अवघड आहे. दुष्काळाला कंटाळून महाराष्ट्रात विदर्भामध्ये शेतकरी आत्महत्त्या करीत आहेत. याचे मुख्य कारण मनाची दुर्बलता आहे, हेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे. माध्यमांच्या वाढलेला आवेग आणि विस्कळीत होत असलेली कुटुंबव्यवस्था याचा परिणाम सामाजिक बांधिलकीवरही होताना दिसून येतो. भारतीय समाज सध्या एखाद्या अंधकारमय बोगद्याकडे जात आहे, या समाजाला प्रकाशाचा किरण कधी दिसेल हे सांगता येत नाही.आजचे युग हे माध्यमांचे युग आहे असे बोलले जात असले तरी, समाजाने आपली सद्विवेकबुद्धी जागरूक ठेवून मनाची शक्ती ओळखण्याची गरज आहे. प्रसारमाध्यमे कोणती स्वीकारायची अन् कोणती नाही, हे नागरिकांनीच ठरवायचे आहे, असेही गांगल यांनी यावेळी सांगितले.