शहरं
Join us  
Trending Stories
1
Sachin Pilot : "काँग्रेसला भाजपापेक्षा जास्त जागा मिळतील; जे खूप वर जातात ते एक ना एक दिवस खाली येतात"
2
Ajit Pawar : श्रीनिवास पवारांनी मला साथ देणार असल्याचं सांगितलं होतं, पण....' अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट
3
टोल नाकेवाल्यांनी पैसे घेतले, NHAI ला महागात पडले; परदेशी वाहनमालक नडला, 25000 चा दंड
4
केरळमध्ये वेस्ट नाईल तापाचा प्रादुर्भाव; 'या' धोकादायक आजाराची लक्षणे काय आहेत? जाणून घ्या...
5
शाहीद-करीना नाही तर 'या' जोडीला ऑफर झाला होता 'जब वी मेट', इम्तियाज अलीचा खुलासा
6
मनीष सिसोदियांना दिलासा नाहीच! जामीन याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली
7
उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दिलासा! औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवच
8
अक्षय्य तृतीयेला पंचमहायोग: लक्ष्मीकृपा मिळण्यासाठी ‘हे’ उपाय करा, लाभ मिळवा; शुभच होईल!
9
‘अदानी, अंबानींकडून किती माल उचलला, त्यांना शिव्या देणं अचानक कसं काय बंद केलं?’, मोदींचा काँग्रेसला सवाल  
10
शरद पवारांनी दिलेला 'तो' प्रस्ताव काँग्रेसनं फेटाळला होता; संजय निरुपमांचा दावा
11
...तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा महाराष्ट्र चालवणार का? संजय राऊतांचा सवाल
12
ना विराट, ना रोहित! पॅट कमिन्सचा आवडता भारतीय खेळाडू कोण? त्याचं धक्कादायक उत्तर
13
'भाजपमुळे मस्ती वाढली'; मराठी गुजराती वादावार आदित्य ठाकरेंचा संताप
14
Akshaya Tritiya 2024 ला सोनं खरेदी करणार असाल तर मोबाइलमध्ये ठेवा 'हे' App; फसवणूक होणार नाही
15
"'केम छो वरली' म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना आता मराठी मतांसाठी..."; मनसेचा पलटवार
16
मुस्लिमांना कुठे, किती अन् कसं मिळते आरक्षण; भारतीय संविधानात काय म्हटलंय? जाणून घ्या
17
गुरु-शुक्र अस्तंगत: अडीच महिने विवाह मुहूर्त नाही? जुलैनंतर थेट नोव्हेंबरमध्ये सनई चौघडे
18
वडिलांच्या गैरहजेरीत अनेकदा नातेवाईकांनी दिला होता सनीला चोप; म्हणाला, 'रक्त येईपर्यंत मी...'
19
Sanju Samson Controversy : हे वागणं बरं नव्हं! सॅमसनचा पारा चढला पण झाली मोठी कारवाई
20
पाकिस्ताननं बांगड्या भरल्या नाहीत, इंडिया आघाडीचे नेते फारुख अब्दुल्ला यांचं विधान

मोठे उद्योग आणण्यासाठी प्रयत्नशील सुभाष देसाई : औद्योगिक संघटना पदाधिकाºयांशी साधला संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2017 1:26 AM

नाशिक : नाशिकच्या औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असून, सद्यस्थितीत दिंडोरी येथे जागा उपलब्ध असल्याने त्याठिकाणी लवकरच मोठे उद्योग आणण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याची माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी बुधवारी (दि. २७) औद्योगिक संघटनांच्या पदाधिकाºयांशी बोलताना दिली.

ठळक मुद्देकायमस्वरूपी प्रदर्शन केंद्र उभारणीराज्यात दोन हजार प्लॉट घेतले

नाशिक : नाशिकच्या औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असून, सद्यस्थितीत दिंडोरी येथे जागा उपलब्ध असल्याने त्याठिकाणी लवकरच मोठे उद्योग आणण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याची माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी बुधवारी (दि. २७) औद्योगिक संघटनांच्या पदाधिकाºयांशी बोलताना दिली.नाशिक दौºयावर आलेल्या उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी औद्योगिक संघटनांच्या पदाधिकाºयांशी चर्चा करताना नाशिकच्या विकासासाठी सरकार सकारात्मक प्रयत्न करीत आहे. त्यात प्रामुख्याने ओझरजवळ नाशिकपासून २२ किलोमीटरवर कायमस्वरूपी प्रदर्शन केंद्र उभारणीच्या कामाला गती देण्यात येणार आहे. त्यासाठी एसपीव्हीदेखील तयार झालेला असल्याचे सांगितले. आयटी पार्कची जागा इतर उद्योगांना देण्यासाठी निर्णय घेण्यात आलेला आहे. इमारतीच्या जागेचे दर कमी करण्यात येणार आहेत. राज्यात उद्योग उभारणीच्या उद्देशाने दिलेल्या जागेचा गैरवापर केला जात होता. तसे प्लॉट परत घेण्यात आले आहेत. राज्यात असे दोन हजार प्लॉट घेतले असून, नाशिक विभागातून ३० प्लॉट परत घेतलेले आहेत. ते पुढील प्रक्रियेतून वाटप केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. या बैठकीस एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता नितीन वानखेडे, जिल्हा उद्योग केंद्राचे पी. डी. रेंदाळकर, निमाचे अध्यक्ष मंगेश पाटणकर, नाईसचे चेअरमन विक्रम सारडा, क्रेडाई अध्यक्ष सुनील कोतवाल, नेमिचंद पोद्दार, इंजिनिअरिंग क्लस्टरचे चेअरमन नरेंद्र गोलिया, अतुल चांडक, हेमंत राठी, संजीव नारंग, नाशिक सिटीझन फोरमचे डॉ. नारायण विंचूरकर, हेमंत बक्षी, मधुकर ब्राह्मणकर, उदय खरोटे, खुशाल पोद्दार, उदय घुगे, आशिष नहार आदी उपस्थित होते. नाशिकच्या उद्योजकांच्या पुढाकाराने मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या ‘मेक इन नाशिक’ उपक्रमात आलेल्या १२०० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीच्या प्रस्तावाला तातडीने दिंडोरी परिसरात जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे. आगामी तीन ते चार महिन्यांत दिंडोरी परिसरातील पायाभूत सुविधा पूर्ण केल्या जाणार आहेत. त्यापाठोपाठ लगेचच नवीन प्रकल्पांचा विचार केला जाणार असल्याचे देसाई यांनी यावेळी सांगितले.