Students were sent to the border troops | सीमेवरील सैनिकांना विद्यार्थ्यांनी पाठविल्या राख्या

बोपेगाव आश्रमशाळेत सैनिकांसाठी तयार केलेल्या राख्या दाखविताना विद्यार्थी. समवेत हेमवती कुर्हाडे, जयमाला भामरे, अधिक्षिका रु पाली बावणे.

दिंडोरी : घरापासून कोसो दूर असणाऱ्या सीमेवरील सैनिकांनारक्षाबंधनाला आपल्या बहिणीची आठवण येतेच. या भावनिक प्रसंगाला मायेची सोबत करण्यासाठी बोपेगाव आश्रम शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनींनी सीमेवरील आपल्या या भावंडांसाठी रक्षाबंधनानिमित्त राख्या पाठवून त्यांच्याप्रती कृतज्ञतेची भावना व्यक्त केली आहे.
रक्षाबंधन हा सण भाऊ व बहिण यांच्या प्रेमाचे प्रतिक असणारा पवित्र सण आहे. बहीण भाऊ या सणाला एकेमकाना भेटतात अन राखी बांधून घेतात. पण घरापासुंग हजारो मैल दूर जाऊन देशाची अहोरात्र सेवा करणार्या सैनिकभावांना कोण राखी बांधणार असा प्रश्न असल्याने धागा शौर्य का उपक्र म राबवित आम्ही तुमच्या सोबत सदैव आहोत हा संदेश देत बोपेगाव येथील आश्रम शाळेतील विद्यार्थिनींनी सैनिकांना राख्या पाठवल्या. येथील उपक्र मशील शिकिक्षा हेमवती कुर्हाडे यांनी विद्यार्थिनींकडून राख्या बनवून घेत त्या पंजाब येथील भारत पाकिस्तान सीमेवर कर्तव्यावर असणार्या सीमा सुरक्षा बलाच्या जवानांपर्यंत पोहचिवण्याची व्यवस्था केली. यावेळी स्वत: राख्या बनवतांना विद्यार्थिनींच्या चेहर्यावर एक वेगळाच आनंद व उत्साह दिसत होता. सैनिकांचे मनोधैर्य, शौर्य, देशप्रेमाचा ध्यास देशाभिमान व त्याग ही मूल्ये विद्यार्थामध्ये जोपासली जावी या उद्देशाने हा उपक्र म शाळेच्या वतीने घेण्यात आल्याची माहिती हेमवती कुर्हाडे यांनी दिली.
या उपक्र माच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री एस एस बागुल यांचे मार्गदर्शनाखाली एस.बी.थोरिमसे, बी.बी. निकम, गवळी व्ही. एस., मोरे ए.डी., सूर्यवंशी एस.के,. जाधव एस.एन. ,अशोकिअहरे ,प्रशांत चव्हाण ,अधीक्षक सुधीर करवते, हेमवती कुर्हाडे, जयमाला भामरे, आशा डोखे, अधिक्षिका रु पाली बावणे आदींनी परिश्रम घेतले.
कृतज्ञतेची भावना : बोपेगाव आश्रमशाळेत ‘धागा शौर्य का’ उपक्र म

Web Title: Students were sent to the border troops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.