शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
4
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
5
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
6
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
7
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
8
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
9
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
10
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
11
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
12
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
13
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
14
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
15
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
16
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
17
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
18
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
19
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
20
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 

विद्यार्थ्यांनी घेतली प्रत्यक्ष विमान उड्डाणाची अनुभूती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2019 7:13 PM

जमिनीवरून विमान हवेत नेमके झेपावते कसे, असा चिमुकल्यांना नेहमी पडणारा प्रश्न आणि त्याच उत्तराची भूक भागविण्यासाठी शिक्षकांकडून पारंपरिक पद्धतीने दिले जाणारे उत्तर मात्र त्यांचे कुतहूल शमविण्यास पुरेसे ठरत नाही. त्यामुळेच घोटेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांनी शिर्डी येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाची क्षेत्रभेट घडवून आणत विद्यार्थ्यांना विमान उड्डाणांची प्रत्यक्ष अनुभूती दिली.

सिन्नर : जमिनीवरून विमान हवेत नेमके झेपावते कसे, असा चिमुकल्यांना नेहमी पडणारा प्रश्न आणि त्याच उत्तराची भूक भागविण्यासाठी शिक्षकांकडून पारंपरिक पद्धतीने दिले जाणारे उत्तर मात्र त्यांचे कुतहूल शमविण्यास पुरेसे ठरत नाही. त्यामुळेच घोटेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांनी शिर्डी येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाची क्षेत्रभेट घडवून आणत विद्यार्थ्यांना विमान उड्डाणांची प्रत्यक्ष अनुभूती दिली.विमानांची उड्डाणे पाहून काही दिवसांपासून पडलेल्या विमान उड्डाणाच्या प्रश्नांचे उत्तर मिळाल्याने चिमुकल्यांनीही भविष्यात पायलट होण्याचे स्वप्न उराशी बाळगण्याची भरारी घेतल्याचे त्यांच्या प्रसन्न चेहऱ्यावरून दिसून आले.विमानतळ, विमानाचे उड्डाणासह प्रसादालयातील स्नेहभोजन, साईबाबा समाधी दर्शन, शिवसृष्टी, पक्षी संग्रहालय, मत्स्यालय, गोशाळा भेटीचा प्रत्यक्ष अनुभव घेत चिमुकल्यांनी आनंदाची लयलूट केली. प्राथमिक शाळेच्या चिमुकल्यांची क्षेत्रभेट नुकतीच शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळ व तीर्थक्षेत्र शिर्डी येथे पार पडली. ही क्षेत्रभेट वैज्ञानिक व आध्यात्मिक दृष्टिकोन, पशुपक्ष्यांविषयी प्रेम, ऐतिहासिक ज्ञान, परस्पर सहकार्य व प्रेम निर्माण करणारी ठरली. विद्यार्थ्यांना प्रारंभी शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळ व परिसर दाखिवण्यात आला. एरवी उत्सुकतेने आकाशात उडणारे विमान पाहणारे चिमुकले प्रत्यक्ष विमान व विमानाचे उड्डाण पाहून आनंदून गेले. विमानतळावरील अधिकारी वर्गाने मार्गदर्शन करत माहिती दिली. विमानतळाहून शिर्डीकडे मार्गस्थ होताना नांदुर्खी गावात शिक्षक सोनाली शिंदे व शरद काकडे यांनी सर्व १११ विद्यार्थ्यांना आईस्क्रीमची मेजवानी देत चिमुकल्यांचा आनंद द्विगुणित केला. प्रसादालयात सर्वांनी शांततेत स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला. अध्यात्माला विज्ञानाची जोडप्रसादालयाजवळील शिवसृष्टीला भेट देत विद्यार्थ्यांनी शिवकालीन, ऐतिहासिक तलवारी, हत्यारांची पाहणी करत त्यांची माहिती जाणून घेतली. साईबाबा समाधीचे दर्शन घेतले. साई पालखी निवारा येथील मत्स्यालय, पक्षी संग्रहालय, गोशाळेस भेट दिली. यातून विद्यार्थ्यांमध्ये प्राणिप्रेम निर्माण होण्यास मदत होणार आहे. पालखी निवारा परिसरात मोकळ्या मैदानात विद्यार्थी मनसोक्त बागडल्यानंतर पालखी निवारा समूहाकडून देण्यात आलेल्या सोनपापडी व फरसाणवर श्रमपरिहार करण्यात आला. अध्यात्माला विज्ञानाची जोड देण्याचा शिक्षकांचा हा प्रयत्न ग्रामस्थांना अधिक भावला. 

 

टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थी