स्थानिक समस्या निराकरणासाठी विद्यार्थ्यांनी संशोधनात्मक प्रयत्न करावे _ डॉ. रमण गंगाखेडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:18 PM2021-06-10T16:18:48+5:302021-06-10T16:26:11+5:30

विद्यार्थ्यांनी कोविड परिस्थितीचे अवलोकन करुन स्थानिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी संशोधनात्मक प्रयत्न करावेत. तसेच विद्यापीठाने संशोधनासाठी विविध अभ्यासक्रम व उपक्रम घ्यावेत त्याचा भविष्यात समाजाला मोठया प्रमाणात उपयोग होणार असल्याचे प्रतिपादन डॉ.राष्ट्रीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे माजी संचालक डॉ. रमण गंगाखेडकर यांनी केले आहे.

Students should make research efforts to solve local problems _ Dr. Raman Gangakhedkar | स्थानिक समस्या निराकरणासाठी विद्यार्थ्यांनी संशोधनात्मक प्रयत्न करावे _ डॉ. रमण गंगाखेडकर

स्थानिक समस्या निराकरणासाठी विद्यार्थ्यांनी संशोधनात्मक प्रयत्न करावे _ डॉ. रमण गंगाखेडकर

Next
ठळक मुद्देआरोग्य विद्यापीठ वर्धापन दिन ऑनलाईन पद्धतीने साजरा डॉ. रमण गंगाखेडकर यांनी केले विद्यार्थ्यांना मार्गदर्शन विद्यार्थ्यांनी कोविडचे अवलोकन करण्याचा सल्ला

नाशिक : विद्यार्थ्यांनी कोविड परिस्थितीचे अवलोकन करुन स्थानिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी संशोधनात्मक प्रयत्न करावेत. तसेच विद्यापीठाने संशोधनासाठी विविध अभ्यासक्रम व उपक्रम घ्यावेत त्याचा भविष्यात समाजाला मोठया प्रमाणात उपयोग होणार असल्याचे प्रतिपादन डॉ.राष्ट्रीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे माजी संचालक डॉ. रमण गंगाखेडकर यांनी केले आहे.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा २३ वा वर्धापन दिन प्रभारी कुलगुरु डॉ. नितीन करमाळकर यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन पद्धतीने साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. व्यासपीठावर डॉ. कालिदास चव्हाण, परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक, वित्त व लेखाधिकारी एन. व्ही. कळसकर, विद्यार्थी कल्याण विभागाचे प्र संचालक संदीप कुलकर्णी, विद्यापीठ प्राधिकरण सदस्य आदी उपस्थित होते. डॉ. रमण गंगाखेडकर म्हणाले, समाजपयोगी संशोधनासाठी उर्मी व इच्छाशक्ती महत्वाची असून कोणत्याही क्षेत्रात प्रगती करावयाची असेल तर संशोधन होणे गरजेचे आहे. त्यासाठी शिक्षण घेतांना मुलांना वैचारिक स्वातंत्र्य देण्याची ‌आवश्यकता आहे. त्यामुळे त्यांची सामाजिक व शैक्षणिक इच्छाशक्ती प्रबळ होईल. विद्यापीठाने शिक्षक व विद्यार्थ्यांकरीता जास्तीत जास्त प्रशिक्षण कार्यशाळा घेतल्यास प्रगतीला नवी दिशा मिळेल, असेही त्यांनी नमूद केेले.तर विद्यापीठ आवारात नव्याने सुरु होणाऱ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचा उपयोग समाजाला होणार असून आरोग्य क्षेत्रात संशोधन व कार्य करण्यासाठी मोठया प्रमाणात संधी आहेत , त्याचा विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी उपयोग करून घेण्याचा तसेच विद्यापीठाकडून घेण्यात येणाऱ्या कार्यशाळा व उपक्रमात सहभाग घेऊन व्यापक संशोधन करण्याचे आवाहन प्रभारी कुलगुरू डॉ. नितीन करमाळकर यांनी केले आहे.  दरम्यान, पर्यावरण संवर्धनासाठी राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून सर्व संलग्नित महाविद्यालयात वृक्षारोपण करण्याचे निर्देश विद्यापीठाकडून देण्यात आले. तसेच विद्यापीठ आवारात डॉ. नितीन करमाळकर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे यांनी केले.

Web Title: Students should make research efforts to solve local problems _ Dr. Raman Gangakhedkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app