जनता विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी जवानांसाठी पाठविल्या सीमेवर राख्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2019 22:08 IST2019-08-10T22:08:17+5:302019-08-10T22:08:36+5:30
औदाणे : घरापासून दूर राहणाऱ्या सीमेवरील सैनिकांना रक्षाबंधनाला आपल्या बहिणीची आठवण येतेच. मात्र मायेची सोबत करण्यासाठी द्याने (ता. बागलाण) येथील जनता विद्यालयातील विद्यार्थिनींनी सीमेवरील या भावंडांसाठी रक्षाबंधनानिमित्त पर्यावरण पुरक राख्या पाठवून कृतज्ञेची भावना व्यक्त केली आहे.

जनता विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी जवानांसाठी पाठविल्या सीमेवर राख्या
औदाणे : घरापासून दूर राहणाऱ्या सीमेवरील सैनिकांना रक्षाबंधनाला आपल्या बहिणीची आठवण येतेच. मात्र मायेची सोबत करण्यासाठी द्याने (ता. बागलाण) येथील जनता विद्यालयातील विद्यार्थिनींनी सीमेवरील या भावंडांसाठी रक्षाबंधनानिमित्त पर्यावरण पुरक राख्या पाठवून कृतज्ञेची भावना व्यक्त केली आहे.
घरापासून हजारो मैल दूर जाऊन देशाची अहोरात्र सेवा करणाºया सैनिकभावांसाठी ‘धागा शौर्य का उपक्र म’ राबवित आम्ही तुमच्या सोबत सदैव आहोत हा संदेश देत या विद्यालयातील विधार्थिनींनी पर्यावरण पुरक राख्या पोस्टमन चंद्रशेखर कापडनीस यांच्याकडे सुपर्द करत पोस्टाने पाठविल्या. यावेळी स्वत: राख्या बनविलेल्या विद्यार्थिनींच्या चेहºयावर एक वेगळाच आनंद व उत्साह दिसत होता.
या उपक्र माच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक एस. एस. सुर्यवंशी, शिक्षक आप्पा कापडणीस देवरे, चंद्रकला कापडणीस, राहुल चीलगर, मनोज पाटील, संदीप आहीरे, दिनकर भामरे, रामभाऊ चौधरी, संजीव लोखंडे, लक्ष्मीकांत भामरे ,ज्योत्स्ना घुले, प्रियंका कापडणीस, योगिता खैरनार, तुषार कापडणीस, अनिकेत वाघ, सुरेश सोनवण,े शरद माळी आदींनी परिश्रम घेतले.
द्याने येथील जनता विद्यालयाततर्फे सैनिकांना बनविण्यात आलेल्या राख्या पोस्टमन चंद्रशेखर कापडणीस यांच्याकडे सुपूर्द करताना विद्यार्थिनी व शिक्षक.
(फोटो १०औंदाणे)