शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थी बस सवलतीपासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2018 01:31 IST

राज्य सरकारने दुष्काळी परिस्थिती जाहीर केलेल्या तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी विविध उपाययोजना लागू करून सोयीसवलती दिल्या असल्या तरी, नाशिक दुष्काळी तालुक्यांत समावेश असलेल्या नाशिक महापालिका हद्दीतील विद्यार्थ्यांना मात्र मोफत बस पास देण्यास एस. टी. महामंडळाने नकार दिला आहे.

नाशिक : राज्य सरकारने दुष्काळी परिस्थिती जाहीर केलेल्या तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी विविध उपाययोजना लागू करून सोयीसवलती दिल्या असल्या तरी, नाशिकदुष्काळी तालुक्यांत समावेश असलेल्या नाशिक महापालिका हद्दीतील विद्यार्थ्यांना मात्र मोफत बस पास देण्यास एस. टी. महामंडळाने नकार दिला आहे. दुष्काळी योजनांची अंमलबजावणीची जबाबदारी शासनाने जिल्हाधिकाºयांवर निश्चित केलेली असून, त्यांचा आदेश मानण्यासदेखील महामंडळ तयार नसल्यामुळे त्याचा फटका शहरातील हजारो शाळकरी, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना बसला आहे.  अपुºया पावसामुळे जिल्ह्यातील दहा तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला असून, त्यात नाशिक, चांदवड, सिन्नर, मालेगाव, बागलाण, देवळा, नांदगाव, इगतपुरी या तालुक्यांचा तसेच निफाड व येवला तालुक्यातील १७ मंडळांचा समावेश आहे. या तालुक्यांमध्ये पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देण्याबरोबर शेतकºयांकडील वसुलीला स्थगिती, वीजदरात सवलत, रोहयो कामांना प्राधान्य, शेतसारा वसुली माफ, विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क माफ, विद्यार्थ्यांना बस पास सवलत अशा विविध उपाययोजना करून जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. दुष्काळी उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी जिल्हाधिकाºयांवर निश्चित करण्यात आलेली असून, त्यांनी संबंधित खात्यांशी संपर्क व संवाद साधून त्याचा लाभ जनतेपर्यंत पोहोचतो की नाही यावर लक्ष द्यायचे आहे.उपरोक्त योजनांची अंमलबजावणी सुरू झाल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात असला तरी, एस.टी. महामंडळाने विद्यार्थ्यांना बस पास सवलत योजनेबाबत काढलेल्या आदेशात शैक्षणिक, तांत्रिक तसेच व्यावसायिक शिक्षण घेणाºया उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडून वसूल करण्यात येत असलेली बस पास सवलतीची रक्कम नोव्हेंबर ते एप्रिल २०१९ पर्यंत येऊ नये, असे नमूद करतानाच सदरची सवलत शहरी बस सेवेसाठी लागू असणार नसल्याचे म्हटले आहे.दुष्काळी तालुक्यांचा समावेशएस.टी. महामंडळाच्या या निर्णयाने नाशिक जिल्ह्यातील सुमारे ५५ हजार विद्यार्थ्यांना बस पास सवलतीचा लाभ होणार असला तरी, नाशिक महापालिकेच्या हद्दीतील विद्यार्थ्यांना मात्र त्यापासून वंचित रहावे लागणार आहे. दुष्काळी तालुक्यात नाशिक तालुक्याचाही समावेश असून, त्यात नाशिकसह तालुक्यातील ९० गावांचा समावेश असतानाही एस. टी. महामंडळाने महापालिका हद्द वगळली आहे. या संदर्भात विभाग नियंत्रकांकडे जिल्हा प्रशासनाने विचारणा केल्यावर त्यांनी वरिष्ठ कार्यालयाकडे बोट दाखविले आहे. नाशिक शहरातील हजारो विद्यार्थी दररोज शहर बसने प्रवास करीत असून, त्यांना मात्र आता वंचित रहावे लागत आहे.

टॅग्स :droughtदुष्काळNashikनाशिक