आर्यन कराटे स्पर्धेत विद्यार्थ्यांचे यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2019 06:30 PM2019-09-24T18:30:00+5:302019-09-24T18:30:31+5:30

येथील एमएसजीएस इंग्लिश मीडिअम स्कूलने जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत पदकांची कमाई केली.

Student Success in Aryan Karate Competition | आर्यन कराटे स्पर्धेत विद्यार्थ्यांचे यश

अंदरसूल येथील एमएसजीएस इंग्लिश मीडिअम स्कूलच्या कराटे स्पर्धेतील विजेत्या संघांसमवेत देवीदास निगळ, मानसी चौधरी, अल्ताफ खान, प्रशांत बिवाल व रोहिदास ठाकरे आदी.

googlenewsNext

अंदरसूल : येथील एमएसजीएस इंग्लिश मीडिअम स्कूलने जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत पदकांची कमाई
केली.
नाशिक येथे झालेल्या कराटे स्पर्धेत स्कूलच्या विद्यार्थ्यांनी आपल्या उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत पदकांची कमाई केली. यात सात सुवर्णपदक, पाच रजत पदक व दोन कांस्य पदक पटकावले. सुवर्णपदक विजेते : रु द्र सुराशे, वीर भालेराव, समर्थ राजुळे, पीयूष एंडाईत, अभिषेक कुमावत, निखिल माळी, सार्थक थोरात. रजतपदक विजेते : रेहान पठाण, आदित्य हगवणे, जयेश सोनवणे, आदित्य थोरात, मोहम्मद अली खान. कांस्य पदक विजेते : ओमकार देशमुख, संकेत पुणे त्याचप्रमाणे क्र ीडाशिक्षक व स्कूलला प्रत्येकी एक चषक मिळाला. बक्षीस वितरणासाठी प्रमुख आकर्षण प्रधानमंत्री या मराठी चित्रपटाचे कलाकार देवीदास निगळ व मानसी चौधरी होते. त्यांच्या हस्ते बक्षीस वितरण झाले. या विद्यार्थ्यांना स्कूलचे प्रिन्सिपल अल्ताफ खान यांच्या मार्गदर्शनाखाली क्र ीडाशिक्षक प्रशांत बिवाल व रोहिदास ठाकरे तसेच आर्यन कराटे प्रशिक्षक शिहान प्रवीण बी़ सानप यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

Web Title: Student Success in Aryan Karate Competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.