शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

पाण्यासाठी संतप्त महिलांचा ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2019 6:28 PM

सटाणा:शहरात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. पंचवीस दिवसाआड देखील पाणी मिळत नसताना देखील पालिका प्रशासनाने कोणत्याही उपाययोजना न केल्याने पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे संतप्त महिलांनी शुक्र वारी (दि. 19) पालिका प्रवेशद्वारा समोर दोन तास ठिय्या आंदोलन केले.

ठळक मुद्देप्रशासनाचे दुर्लक्ष : सटाणा पालिका प्रवेशद्वारासमोर आंदोलन

सटाणा:शहरात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. पंचवीस दिवसाआड देखील पाणी मिळत नसताना देखील पालिका प्रशासनाने कोणत्याही उपाययोजना न केल्याने पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे संतप्त महिलांनी आज शुक्र वारी (दि. 19) पालिका प्रवेशद्वारा समोर दोन तास ठिय्या आंदोलन केले.दरम्यान शहरातील टंचाई निवारणसाठी तातडीने उपाययोजना करण्यासाठी नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी बैठक घेऊन सूचना केल्यानंतर महिलांनी ठिय्या मागे घेतला.गेल्या 1 वर्षापासून सटाणा शहरात भीषण पाणी टंचाई आहे . त्यावर त्विरत व दीर्घ मुदतीसाठी कायमस्वरु पी उपाय करावेत अशी मागणी केली होती .मात्र पालिकेने कोणत्याही उपाययोजना न केल्याने संतप्त झालेल्या 25 ते 30 महिलांनी आज शुक्र वारी दुपारी 12 वाजता पालिका कार्यालयावर हल्लाबोल करून प्रवेशद्वारा जवळच ठिय्या दिला.यावेळी आंदोलनकर्त्या एड.सरोज चंद्रात्रे म्हणाल्या की, गेल्या एिप्रल मध्ये जिल्हाधिकारी सटाणा येथे आले असतांना पाणी टंचाईची भीषणता त्यांना दर्शवण्यात आली होती . यावर विहीरी अधिग्रहीत करु न पाणी टंचाई आटोक्यात आणण्याचे आश्वासन देण्यात आले होते . मात्र नगरपालिके मार्फत कोणतीही उपाययोजना करण्यात आली नाही . परिणामी पिण्यासाठी व वापरासाठी पाणी उपलब्ध नसल्याने सामान्य नारिक हैराण झाले आहेत . पिण्यासाठी वीस लिटर पाण्यासाठी 60 ते 70 रु पये मोजावे लागत आहेत . त्यामुळे पाणी पट्टी भरूनही गरीब जनता भरडली जात असल्याचे निदर्शनास आणून दिले. . पुनद प्रकल्प पूर्णत्वास जाण्यास कमीत कमी दिड ते दोन वर्षाचा अवधी लागणार आहे . अशा परिस्थितीत नगरपालिका ढिम्मपणे बसुन आहे . पाण्यासाठी नागरिक हैराण झाले असुन नगरपालिके मार्फत काहीच पाणीपुरवठा करण्यात येत नसल्याचा आरोप करत शहरात पाणी पुरवठा करण्याबाबत ठोक रु परेखा जनतेला दयावी अशी मागणी केली.दरम्यान नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी आंदोलनकर्त्याशी भेट घेऊन चर्चा केली. मात्र ठोस उपाययोजना केल्या शिवाय आंदोलन मागे घेणार नाही अशी ठाम भूमिका घेतली. यावेळी नगराध्यक्ष मोरे यांनी तात्काळ पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी तसेच आंदोलनकर्त्या महिलांची संयुक्त बैठक घेतली. या बैठकीत ज्या भागात पाणीपुरवठा होत नाही त्या भागात टँकरने तात्काळ पाणीपुरवठा करावा अशा सूचना दिल्या तसेच विहीर अधिग्रहण करण्यासाठी कार्यवाही करावी जेणेकरून जलकुंभ भरून शुद्ध पाण्याचा पुरवठा करता येईल असे स्पष्ट. आंदोलनाची तात्काळ दखल घेतल्याने दोन तासांनी ठिय्या मागे घेण्यात आले. आंदोलनात सरोज चंद्रात्रे, रु पाली पंडित, वंदना भामरे, किरण परदेशी,वंदना सोनवणे, मंगल सोनवणे,विनता सोनवणे,लता पगार, विजया सोनवणे,राधाबाई पगार,संगीता सोनवणे,सुनंदा पवार,शुभांगी कुलकर्णी,ललिता मुळे आदी सहभागी झाले होते.

टॅग्स :Nashikनाशिकwater shortageपाणीटंचाई