शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

दमदार ‘कम बॅक’ : शहरात सायंकाळी पुन्हा वर्षावाचा अंदाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2019 13:52 IST

मागील वर्षाचा जुलैपर्यंतचा हंगामी पावसाचा आकडा ४३०.१ ओलांडला जाऊ शकतो. गेल्या वर्षी जुलैच्या ३१ दिवसांत २८४.१ मि.मी इतका पाऊस झाला होता. यावर्षी या वीस दिवसांत २९८मि.मीपर्यत पाऊस पडल्याची माहिती पेठरोडवरील हवामान निरिक्षण केंद्राकडून दिली गेली.

ठळक मुद्देवीस दिवसांत शहरात २९८मि.मीपर्यत पाऊसगंगापूर धरणाचा साठा ५५ टक्क्यांवरशुक्रवारी बागलाणमध्ये सुमारे १०० मिमीपर्यंत पावसाची नोंद गेल्या वर्षी जुलैच्या ३१ दिवसांत २८४.१ मि.मी इतका पाऊस

नाशिक : मागील दहा दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने पुन्हा शुक्रवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास दणक्यात ‘कम बॅक’ केले. सायंकाळपासून शनिवारी (दि.२०) सकाळी आठ वाजेपर्यंत शहरात २२.२ मिमी इतका पाऊस झाला. या हंगामात अद्याप ४०५.४ मिमीपर्यंत पाऊस पडला आहे. अद्याप जुलैचे दहा दिवस शिल्लक असून पावसाची शक्यताही वर्तविली जात आहे. त्यामुळे मागील वर्षाचा जुलैपर्यंतचा हंगामी पावसाचा आकडा ४३०.१ ओलांडला जाऊ शकतो. गेल्या वर्षी जुलैच्या ३१ दिवसांत २८४.१ मि.मी इतका पाऊस झाला होता. यावर्षी या वीस दिवसांत २९८मि.मीपर्यत पाऊस पडल्याची माहिती पेठरोडवरील हवामान निरिक्षण केंद्राकडून दिली गेली. त्यामुळे यावर्षी शहरी नाशिककरांना पावसाने अद्याप निराश केले असे म्हणता येणार नाही; मात्र जिल्ह्यात पावसाने निश्चित निराश केले आहेत. अद्याप बहुतांश तालुके कोरडेठाक पडले आहेत.शुक्रवारच्या पावसाने जिल्ह्यातील जवळपास सर्वच तालुक्यांमध्ये कमी-अधिक प्रमाणात हजेरी लावली. नाशिक तालुक्यात ३३ मिमी पाऊस पडला तर दुष्काळी तालुका म्हणून जाहीर झालेल्या बागलाण भागातील नागरिकांवर पर्जन्यराजाने अखेर कृपादृष्टी केली असे म्हणणे वावगे होणार नाही. शुक्रवारी बागलाणमध्ये सुमारे १०० मिमीपर्यंत पावसाची नोंद झाली. तसेच सिन्नर तालुक्यातही ५७, देवळ्यात ४६.२, कळवणमध्ये २२ तर चांदवड तालुक्यात ४१ मिमीपर्यंत पाऊस पडला. एकूणच या तालुक्यांमध्ये पावसाची मागील पंधरवड्यापासून कमालीची प्रतिक्षा केली जात होती.गेल्या आठवड्यात त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, पेठ, नाशिक या तालुक्यांमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली होती; मात्र वरील तालुके कोरडेठाक राहिले होते. दहा दिवसांच्या विश्रांतीनंतर कोरडेठाक राहिलेल्या तालुक्यांना वरूणराजाने प्राधान्य दिल्याचे दिसून आले. कारण शुक्रवारी इगतपुरीमध्ये २१ तर त्र्यंबकेश्वरमध्ये १८ मिमीपर्यंत पावसाची नोंद होऊ शकली.दरम्यान, शनिवारी (दि.२०) पावसाचा इशारा हवामान खात्याकडून दिला गेला आहे. सकाळी काही प्रमाणात शहरात पावसाने हजेरी लावली. सकाळपासून ढगाळ हवामान शहरात कायम असून सायंकाळी पुन्हा जोरदार वर्षाव होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

गंगापूर धरणाचा साठा ५५ टक्क्यांवरगंगापूर धरणाचा जलसाठ्यात शुक्रवारी काही प्रमाणात वाढ झाली. विश्रांतीनंतर पावसाने पाणलोटक्षेत्रात काहीशी हजेरी लावल्यामुळे धरणाचा साठा सकाळी सहा वाजेपर्यंत ५४.७५ टक्के इतका झाला होता. ३ हजार ८३ दलघफूपर्यंत पाण्याची पातळी पोहचली आहे. आज पहाटेपर्यंत गंगापूर धरणक्षेत्रात जवळपास ६०मि.मीपर्यंत पाऊस पडला.

टॅग्स :RainपाऊसNashikनाशिकgangapur damगंगापूर धरण