शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
2
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! खुद्द स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
3
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
4
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
5
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
6
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
7
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
8
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
9
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
10
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
11
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
12
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
13
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
14
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
15
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
16
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
18
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
19
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
20
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
Daily Top 2Weekly Top 5

ग्लोबल व्हिजन स्कूलतर्फे सुदृढ बालक स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2019 00:13 IST

ग्लोबल व्हिजन इंटरनॅशनल स्कूलतर्फे उंटवाडी येथील सिटी सेंटर मॉलमध्ये बाल दिन सप्ताहनिमित्त आयोजित सुदृढ बालक स्पर्धेत मुलांना चांगल्या सवयी कशा लावाव्यात, या विषयावर उपस्थित पालकांना बालरोगतज्ज्ञ डॉ. संगीता लोढा यांनी मार्गदर्शन केले.

नाशिक : ग्लोबल व्हिजन इंटरनॅशनल स्कूलतर्फे उंटवाडी येथील सिटी सेंटर मॉलमध्ये बाल दिन सप्ताहनिमित्त आयोजित सुदृढ बालक स्पर्धेत मुलांना चांगल्या सवयी कशा लावाव्यात, या विषयावर उपस्थित पालकांना बालरोगतज्ज्ञ डॉ. संगीता लोढा यांनी मार्गदर्शन केले. यावेळी व्यासपीठावर डॉ. शीतल पगार, मच्छिंद्रनाथ बोरसे उपस्थित होते.यावेळी पोषण आहार या विषयावर डॉ. शीतल पगार यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, लहान मुलांना नेहमी काही तरी खाण्यासाठी काही नवीन हवे असते. बाजारात जसे लहान मुलांना भुरळ घालणाऱ्या जाहिराती, प्रलोभने, आकर्षक पॅकिंग आणि चटपटीत पदार्थ यांचा वापर करून मुलांना जंक फूड घेण्यास प्रवृत्त करतात, हे टाळावे त्या ऐवजी घरातच सत्त्व टिकून राहतील आणि मुलांना चवीला चांगले लागतील, असे पदार्थ बनवावे.याप्रसंगी डॉ. संगीता लोढा यांनी सांगितले की, लहान मुलांसमोर सतत चांगल्या गोष्टी करत राहिलो तर त्यांना देखील चांगल्या गोष्टी करण्याची सवय लागते. मुलांच्या आहाराबाबत पालकांनी दक्ष राहिले पाहिजे, विशेष माता पालकांनी आपल्या मुलांना काय आवडते तसेच त्याला काय खायला द्यायला हवे याचा विचार करायला हवा त्यानुसार आहार तयार करावा, असेही त्यांनी सांगितले.प्रश्नमंजुषा स्पर्धाफोटोजेनिक फेस रेवांशी विसपुते हिने पटकावला. यावेळी माता पालकांसाठीदेखील प्रश्नमंजूषा स्पर्धा घेण्यात आली. ज्यामध्ये पहिला क्र मांक लीना विसपुते, दुसरा क्र्रमांक माधुरी बोरसे, तर तिसरा क्रमांक पूनम सोनजे व माधुरी पुराणिक यांनी पटकावला. विजेत्यांना डॉ. संगीता लोढा, डॉ. शीतल पगार, मच्छिंद्रनाथ बोरसे, शाळेच्या संचालिका विजयालक्ष्मी मणेरीकर यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. कार्यक्र मात बालगोपाळांसाठी विविध मनोरंजनात्मक स्पर्धा घेण्यात आल्या. या कार्यक्र मात मुलांनी विविध गाण्यांवर नृत्य सादर केले. यावेळी शाळेचे समन्वयक, शाळेच्या शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी आदी मान्यवर उपस्थित होते. या सूत्रसंचालन रागिणी तांबोळी यांनी केले.सिटी सेंटर मॉलमध्ये ‘सुदृढ बालक स्पर्धा’ घेण्यात आली. या स्पर्धेत वय वर्ष ९ पर्यंतच्या मुलांचे वजन, उंची तपासली गेली आणि त्यांच्या सुदृढतेची परीक्षा घेतली गेली. या स्पर्धेचे परीक्षण डॉ. शीतल पगारे, डॉ. संगीता लोढा यांनी केले. या स्पर्धेत पहिला क्र मांक हेरंब कुलकर्णी, दुसरा क्रमांक युगंधर मोजाड, तिसरा अद्विका रणशिवे यांनी पटकावला.

टॅग्स :Schoolशाळाchildren's dayबालदिन