निफाड शहरात रस्त्यावर वर्दळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2020 00:50 IST2020-05-09T21:42:20+5:302020-05-10T00:50:07+5:30
निफाड : ४८ दिवसांच्या लॉकडाउननंतर शनिवारी (दि. ९) निफाड शहरातील हॉटेल, सलून आदी व्यवसाय दुकाने वगळता इतर सर्व दुकाने सुरू करण्यात आली. त्यामुळे शनिवारी शहरात काही ठिकाणी दुकाने उघडली.

निफाड शहरात रस्त्यावर वर्दळ
निफाड : ४८ दिवसांच्या लॉकडाउननंतर शनिवारी (दि. ९) निफाड शहरातील हॉटेल, सलून आदी व्यवसाय दुकाने वगळता इतर सर्व दुकाने सुरू करण्यात आली. त्यामुळे शनिवारी शहरात काही ठिकाणी दुकाने उघडली. त्यामुळे रस्त्यावर नागरिकांची गर्दी दिसून आली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन सुरू झाल्यानंतर नगरसेवक राजाभाऊ शेलार, अनिल कुंदे यांनी नगरपंचायतीचे प्रभारी मुख्याधिकारी अभिजित कदम, भालचंद्र क्षीरसागर या सर्व नगरपंचायतीचे अधिकारी व कर्मचारी व निफाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रंगराव सानप व पोलीस यंत्रणा या सर्वांना सोबत घेऊन कोरोनापासून निफाडला संरक्षित करणे व दुसऱ्या बाजूला अत्यावश्यक सेवा पुरविणे यासाठी नियोजन केले. त्यामुळे जवळजवळ ४८ दिवस निफाड शहरात १०० टक्के कडक लॉकडाउनची अंमलबजावणी करण्यात आली. आता नागरिकांच्या मागणीनुसार आणि शासकीय निर्देशानुसार लॉकडाउन शिथिल करून शहरातील वरील व्यवसाय सुरू करण्यात आले आहेत.
शनिवारी शहरातील मोबाइल दुकाने, जनरल स्टोअर्स, कापड दुकाने, किराणा दुकान, मोबाइल दुकाने, चप्पल-बूट, सुवर्णकार, पीठ गिरणी, गॅरेज, टेलर्स, भांडी दुकान, मिठाई विक्रेते आदी सर्व प्रकारचे व्यवसाय शहरात सुरू झाले आहेत, मात्र हॉटेल व सलून व्यवसाय बंदच ठेवण्यात आले आहेत.