रेल्वेतून पडल्याने अनोळखी मृत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 01:05 IST2021-03-15T01:04:16+5:302021-03-15T01:05:10+5:30

कसबे सुकेणे शिवारात असलेल्या रेल्वेमार्गावर धावत्या रेल्वेतून पडल्याने डोक्यास दुखापत  झाल्याने एका ६० वर्षीय  अनोळखी इसमाचा  मृत्यू झाला आहे.

Stranger dies after falling from train | रेल्वेतून पडल्याने अनोळखी मृत

रेल्वेतून पडल्याने अनोळखी मृत

ओझरटाऊनशिप : कसबे सुकेणे शिवारात असलेल्या रेल्वेमार्गावर धावत्या रेल्वेतून पडल्याने डोक्यास दुखापत  झाल्याने एका ६० वर्षीय  अनोळखी इसमाचा  मृत्यू झाला आहे.
गुरुवारी (दि.११) दुपारी दीड वाजेच्या सुमारास कसबे सुकेणे शिवारात असलेल्या रेल्वेमार्गावरील किलोमीटर २१० ते २१२च्या दरम्यान मनमाडहून मुंबईकडे (अप) जाणाऱ्या एका धावत्या रेल्वेतून पडल्याने डोक्यास गंभीर दुखापत होऊन एका ६० वर्षीय इसमाचा मृत्यू झाला आहे. हा मृत इसम रंगाने सावळा असून चेहरा उभट आहे. डोक्याचे व दाढीचे केस सफेद व वाढलेले आहेत, उंची १६७ से.मी. असून शरीराने सडपातळ, अंगात राखाडी रंगाचे स्वेटर, लाल रंगाचा हाफ बाह्यांचा शर्ट असे त्याचे वर्णन आहे.

Web Title: Stranger dies after falling from train