धावत्या रेल्वेतून पडल्याने अनोळखी व्यक्तीचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 19:02 IST2021-03-14T19:01:43+5:302021-03-14T19:02:14+5:30
ओझरटाऊनशिप : कसबे सुकेणे शिवारात असलेल्या रेल्वेमार्गावर धावत्या रेल्वेतून पडल्याने डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने एका ६० वर्षीय अनोळखी इसमाचा मृत्यू झाला आहे.

धावत्या रेल्वेतून पडल्याने अनोळखी व्यक्तीचा मृत्यू
ओझरटाऊनशिप : कसबे सुकेणे शिवारात असलेल्या रेल्वेमार्गावर धावत्या रेल्वेतून पडल्याने डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने एका ६० वर्षीय अनोळखी इसमाचा मृत्यू झाला आहे.
गुरुवारी (दि.११) दुपारी दीड वाजेच्या सुमारास कसबे सुकेणे शिवारात असलेल्या रेल्वेमार्गावरील किलोमीटर २१० ते २१२च्या दरम्यान मनमाडहून मुंबईकडे (अप) जाणाऱ्या एका धावत्या रेल्वेतून पडल्याने डोक्यास गंभीर दुखापत होऊन एका ६० वर्षीय इसमाचा मृत्यू झाला आहे.
हा मृत इसम रंगाने सावळा असून चेहरा उभट आहे. डोक्याचे व दाढीचे केस सफेद व वाढलेले आहेत, उंची १६७ से.मी. असून शरीराने सडपातळ, अंगात राखाडी रंगाचे स्वेटर, लाल रंगाचा हाफ बाह्यांचा शर्ट कमरेला भगवा सफेद चौकट असलेला टॉवेल गुंडाळलेला आहे. अशा वर्णनाच्या इसमाबाबत कोणास काही माहिती असल्यास त्यांनी अथवा मृत इसमाच्या नातेवाइकांनी ओझर पोलीस ठाणे येथे आर.एस. घुमरे यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन ओझर पोलिसांनी केले आहे.