गाळणे - नागझरी रस्त्यावर दुचाकी अपघातात एक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 23:57 IST2021-08-18T23:57:00+5:302021-08-18T23:57:47+5:30
मालेगाव : तालुक्यातील गाळणे - नागझरी रस्त्यावर भरधाव वेगात जाणाऱ्या दुचाकीने समोरून येणाऱ्या दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवर पाठीमागे बसलेला एक जण ठार झाला.

गाळणे - नागझरी रस्त्यावर दुचाकी अपघातात एक ठार
मालेगाव : तालुक्यातील गाळणे - नागझरी रस्त्यावर भरधाव वेगात जाणाऱ्या दुचाकीने समोरून येणाऱ्या दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवर पाठीमागे बसलेला एक जण ठार झाला.
यापक्ररणी वडनेर खाकुर्डी पोलिसात दुचाकी (क्रमांक एमएच ४१ बीए ०२७०) वरील अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी लालचंद आनंदा गायकवाड (४५, रा. उपखेड, ता. चाळीसगाव) यांनी फिर्याद दिली आहे. आरोपी त्याच्या ताब्यातील दुचाकी भरधाव वेगात चालवून नागझरी गावाकडून गाळणे गावाकडे भरधाव वेगात जात असताना समोरून येणारी दुचाकी (क्रमांक एमएच ४१ एच ४६९०) ला समोरून धडक दिली. यात फिर्यादीला किरकोळ दुखापत झाली असून, त्याच्या पाठीमागे बसलेला अर्जुन हाटेसिंग सोनवणे (४४, रा. उपखेड, ता. चाळीसगास, जि. जळगाव) याच्या डोक्यास व तोंडास गंभीर दुखापत होऊन त्याच्या मरणास व दुचाकीचे नुकसानीस कारणीभूत होऊन अपघाताची खबर न देता पळून गेला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पवार करीत आहेत.