शहरं
Join us  
Trending Stories
1
"पेट्रोल-डिझेल वाचवा... 'वर्क फ्रॉम होम' पुन्हा सुरू करा!"; असं का म्हणताहेत पंतप्रधान मोदी? सोनं खरेदी न करण्याचंही आवाहन
2
"इराणचं हसणं आता कायमचं बंद होईल"; ट्रम्प यांचा थेट इशारा; ओबामांनी विमानाने पैसे दिल्याचा आरोप
3
"आपल्याकडे परिस्थिती नियंत्रणात पण..."; मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं इंधन आणि गॅस बचतीचं आवाहन
4
IPL 2026 : ट्विस्टवर ट्विस्ट! शेवटच्या चेंडूवर RCB नं जिंकली मॅच; MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT
5
RCB vs MI : दीपक चाहरचा कहर! 'गोल्डन डक'सह किंग कोहलीवर ओढावली 'ही' नामुष्की
6
"...त्यामुळे, माझ्यासोबत येणंच उत्तम!"; पंतप्रधान मोदींची तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना खास ऑफर; बघा नेमकं काय घडलं?
7
पुणे-नाशिक महामार्ग सलग दुसऱ्या दिवशी 'जाम'; लग्नसराई आणि विकेंडमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल
8
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
9
कुटुंबासाठी धोकादायक ठरू शकतात 'या' ५ लोकप्रिय कार! क्रॅश टेस्टमध्ये केवळ ० ते १ रेटिंग; तुमची कार सुरक्षित आहे का?
10
"...तर ममता बॅनर्जी यांना जेलमध्ये जावे लागेल!" बंगाल पराभवानंतर का भडकले TMC चे निलंबित नेते रिजू दत्ता? साधला थेट निशाणा
11
उर्विल पटेलची विक्रमी खेळी! अशक्यप्राय लक्ष्याचा पाठलाग करत CSK नं LSG ला स्पर्धेबाहेर काढलं
12
IPL All Time Records : कमालीचा योगायोग! विराट-रोहितनं एकाच सामन्यात केली धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
13
मातृदिनाचा दिवस काळरात्र ठरला! रील बनवण्याच्या नादात काळजाचे चार तुकडे हरपले; अमरावतीत शोककळा
14
Travel : मे महिन्याच्या उन्हात मिळेल डिसेंबरसारखी थंडी! 'या' ५ ठिकाणांना भेट देऊन सुट्टी करा कूल
15
सुवेंदू अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजनक दावा
16
शेअर मार्केट, बँक बॅलेन्स २१३ कोटी, १०० कोटींच्या FD...! CM विजय यांची संपत्ती आहे तरी किती? असा आहे गुंतवणुकीचा 'फंडा'
17
"बाबा, ही खेळी तुमच्यासाठी..." १३ चेंडूतील विक्रमी फिफ्टीनंतर उर्विल पटेलचं भावूक सेलिब्रेशन
18
पाकिस्तान हादरलं! आत्मघातकी कार बॉम्बस्फोटात १६ जवानांचा मृत्यू; १०० हून अधिक दहशतवाद्यांचा भीषण हल्ला
19
ऑपरेशन सिंदूरचा वचपा काढण्यासाठी पाकिस्तानची नवी चाल; बहावलपूरमध्ये दहशतवाद्यांचा अड्डा पुन्हा उभा!
20
धक्कादायक! अनैतिक संबंधात अडसर, पतीला शॉक देऊन संपवण्याचा प्रयत्न; पत्नीसह प्रियकराला अटक
Daily Top 2Weekly Top 5

नोटबंदीविरोधात राष्ट्रवादीचा रास्ता रोको

By admin | Updated: January 10, 2017 00:31 IST

जिल्ह्यात बंद : कळवण, नांदगावी बस आगारातच; सुरुळीत वीजपुरवठा, कर्ज, वीजबिल माफीची मागणी

कळवण : नोटाबंदीमुळे शेतकरीवर्गा-बरोबरच सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाला असून, या निर्णयाचा निषेध करण्यासाठी जिल्ह्यात ठिंकठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे जागोजागी वाहतूक ठप्प झाली होती.
सोमवारी (दि. ९) सकाळी १० वाजता कळवण बसस्थानकासमोर तासभर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनाचे नेतृत्व जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार, मविप्रचे संचालक रवींद्र देवरे, जिल्हा बॅँक संचालक धनंजय पवार, कळवण नगरपंचायतचे गटनेते कौतिक पगार, ज्येष्ठ नेते नारायण हिरे, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेद्र भामरे यांनी केले. रास्ता रोकोमुळे वाहतूक दुतर्फा ठप्प झाली होती. शालेय विद्यार्थी, नोकरदार व प्रवासी बांधवांना या आंदोलनाचा फटका बसला. त्यामुळे एस.टी. महामंडळाच्या कळवण आगारातून एकही बस बाहेर पडली नाही. नोटाबंदीनंतर ५० दिवसांत बँकेच्या रांगेत उभे राहिलेल्यांपैकी १००हून अधिक व्यक्तींचे बळी गेले आहेत. एटीएम सेंटर बंद आहेत. बाजारपेठा ओस पडल्या आहेत. नोटाबंदीनंतर कॅशलेस प्रणाली म्हणजे जनतेची फसवणूक असल्याचे यावेळी नेत्यांनी केलेल्या भाषणात सांगितले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष राजेंद्र पवार, रायुकॉँ तालुकाध्यक्ष प्रवीण रौंदळ, महादू पाटील, विलास रौंदळ, एकनाथ पगार, डी.एम. गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले.
आंदोलनप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष जितेंद्र पगार, संजय पवार, राजेंद्र पवार, प्रवीण रौंदळ, महादू पाटील, पांडुरंग पाटील, मधुकर जाधव, पंकज पाचपिंड, अमोल पगार, रामा पाटील, सुभाष शिरोडे, यशवंत देशमुख, महेंद्र हिरे, दीपक वाघ, डी.एम. गायकवाड, रवींद्र सोनवणे, जयेश पगार, राज देवरे, कृष्णा बच्छाव, भाऊसाहेब पगार, संजय वाघ, काशीनाथ देशमुख, प्रल्हाद गुंजाळ, शांताराम जाधव, आशुतोष अहेर, दीपक खैरनार, मिलिंद पगार, उमेश सोनवणे, सागर खैरनार आदिंसह तालुक्यातील नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, युवक, शेतकरी, शेतमजूर, कामगार व व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नांदगाव : केंद्र सरकारने जाहीर केलेल्या नोटबंदीच्या विरोधात व शेतमालाला योग्य हमीभाव मिळावा यासाठी राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षातर्फे सोमवारी नांदगाव येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. देशाच्या अर्थव्यवस्थेतील काळा पैसा नष्ट करण्याच्या उद्देशाने नोटा चलनातून रद्द केल्याची घोषणा केली. परंतु एवढा महत्त्वाचा आर्थिक निर्णय घेण्याअगोदर त्यानंतर निर्माण होणाऱ्या परिस्थितीची कोणतीही पूर्वतयारी न केल्याने देशभरातील करोडो नागरिकांना प्रचंड आर्थिक ताण सोसावा लागत आहे. त्यामध्ये प्रामुख्याने शेतकरी, कष्टकरी, कामगार, सर्वसामान्य जनता व मोलमजुरी करणाऱ्यांना मोठ्या प्रमाणात सामोरे जावे लागत आहे. सर्वसामान्यांना बँकेत असलेले स्वत:चे पैसेसुद्धा मिळणे अवघड झाले आहे. गृहिणींना घर कसे चालवायचे हा प्रश्न पडला आहे. गेली चार वर्षं दुष्काळाने होरपळणारा शेतकरी या नोटबंदीमुळे व शेतमालाला योग्य बाजारभाव मिळत नसल्याने मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. या सर्व प्रश्नांवर राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षातर्फे नांदगाव येथे भारतीय स्टेट बॅँकेच्या एटीएमसमोर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे कार्यकर्ते घोषणा देत असताना एटीएमच्या रांगेत पैसे घेण्यासाठी उभे असलेल्या नागरिकांनीही घोषणा देऊन आंदोलनाला पाठिंबा दर्शविला. यावेळी बोलताना चोरांना व भ्रष्टाचाऱ्यांना मदत करून लाखो रु पये जमा करणारे सरकार त्यांनी न केलेल्या कामाच्या खोट्या जाहिराती करून जनतेची दिशाभूल करत असून, भांडवलदाराच्या हातातील बाहुले हे सरकार बनले आहे. असे तालुका अध्यक्ष संतोष गुप्ता यांनी सांगितले. यावेळी आमदार पंकज भुजबळ यांच्या संपर्क कार्यालयापासून ते भारतीय स्टेट बँकेपर्यंत मोर्चा काढून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
यावेळी संतोष गुप्ता, अरुण पाटील, राजाभाऊ पगारे, कैलास पाटील, रमेश पगार, विलास भाबड, महेंद्र गायकवाड, विश्वास अहिरे, अतुल पाटील, राजेंद्र जाधव, सुमित गुप्ता, राहुल भोपळे, सतीश अहिरे, किसन जगधने, सोपान पवार, राजेंद्र लाठे, सुदाम राठोड, संजय शिरसाठ, ज्ञानेश्वर पवार, राजेंद्र आहेर, मधुकर डफाळ, वाल्मीक टिळेकर, मुक्ताराम बागुल, हबीब शेख, इक्बाल शेख, विलास राजुले, दिनेश परांडे, पापा थोमस, सिद्धांत केदारे, पिटर फेरो, भाऊसाहेब सूर्यवंशी, भाऊसाहेब गिते, धनराज बुरकुल, तानसेन जगताप, दीपक खैरनार, प्रताप निकम, बाबासाहेब घाडगे, बाळासाहेब आहेर, सुनील शिरसाठ, बाळासाहेब मोरे, मधुकर बोरसे, रूपेश पाटील, रामदास पवार, धनंजय गोजरे, डॉ. नितीन सोनवणे आदिंसह राष्ट्रवादी कॉँग्रेसाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)