शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

सटाण्यात शेतकऱ्यांचा रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2018 00:40 IST

सटाणा : शेतमालाला हमीभाव मिळावा यासाठी सरकारने स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करावी व शेतकºयांचा सातबारा उतारा कोरा करावा आदी मागण्यांसाठी शनिवारी (दि.२) दुपारी दीडशे ते दोनशे शेतकरी व महिला शेतकºयांनी मोरेनगर जवळून जाणाºया साक्री-शिर्डी राष्ट्रीय महामार्गावर ठिय्या देत एक तास वाहतूक रोखून धरली. या आंदोलनात शिवसेनेने सहभागी होऊन रास्ता रोकोला पाठिंबा दिला. यावेळी आंदोलनकर्त्या शेतकºयांनी रस्त्यावर दूध आणि कांदा ओतून सरकारचा धिक्कार केला.

ठळक मुद्देदूध, कांदा फेकला रस्त्यावर : वाहतूक ठप्प; शासनाविरोधात घोषणाबाजी

सटाणा : शेतमालाला हमीभाव मिळावा यासाठी सरकारने स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करावी व शेतकºयांचा सातबारा उतारा कोरा करावा आदी मागण्यांसाठी शनिवारी (दि.२) दुपारी दीडशे ते दोनशे शेतकरी व महिला शेतकºयांनी मोरेनगर जवळून जाणाºया साक्री-शिर्डी राष्ट्रीय महामार्गावर ठिय्या देत एक तास वाहतूक रोखून धरली. या आंदोलनात शिवसेनेने सहभागी होऊन रास्ता रोकोला पाठिंबा दिला. यावेळी आंदोलनकर्त्या शेतकºयांनी रस्त्यावर दूध आणि कांदा ओतून सरकारचा धिक्कार केला.गेल्या दोन दिवसापासून शेतकºयांनी देशव्यापी संप पुकारला आहे. भाजीपाला, कांदा, दूध आणि धान्य विक्री व वाहतुकीला संपकरी शेतकºयांनी मज्जाव केला आहे. आपल्या विविध मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शनिवारी दुपारी बागलाण तालुक्यातील शेतकºयांनी मोरेनगर जवळ एकत्र येत सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. संतप्त महिला शेतकºयांनी रस्त्यावर दूध ओतून व कांदा फेकून देत निषेध व्यक्त केला.शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख लालचंद सोनवणे, माजी तालुकाप्रमुख अरविंद सोनवणे यांनीदेखील आंदोलनात उत्स्फूर्तपणे सहभाग घेत शेतकरी संपाला पाठिंबा दिला. जिल्हा उपप्रमुख सोनवणे यांनी मोदी सरकारवर टीका केली. मोदी सरकार शेतकरीविरोधी सरकार आहे. शेतकºयाला मातीमोल भावाने ैआपला शेतमाल विकावा लागत आहे, असे त्यांनी सांगितले.पोलीस उपनिरीक्षक गणेश बुवा यांना मागण्यांचे निवेदन सादर करून शेतकºयांनी रास्ता रोको आंदोलन मागे घेतले.या आंदोलनात शेतकरी संघाचे सभापती प्रल्हाद पाटील, प्रवीण बळीराम सोनवणे, दोधा मोरे, सरपंच सुरेश जाधव, कैलास बोरसे, बाळासाहेब देवरे, बाळासाहेब मोरे, भरत अहिरे, सुरेश अहिरे, मुरलीधर खैरनार, मधुकर देवरे, दºहाणेचे सरपंच परशराम पाकळे, मुरलीधर खैरनार, रवींद्र वाघ, रवींद्र अहिरे, प्रकाश मोरे, धर्मेंद्र बागुल, सुनील मोरे यांच्यासह महिला शेतकरी सहभागी झाल्या होत्या.वारंवार होणारा अवकाळी पाऊस, ,गारपीट या अस्मानी संकटाला तोंड देत कष्टाने शेतमाल पिकवतो. मात्र तोच माल मातीमोल भावाने विकावा लागत आहे. यामुळे शेतकºयाच्या पदरात उत्पादन खर्चदेखील पडत नसल्याने शेतकरी दिवसेंदिवस कर्जबाजारी होऊन नैराश्यातून तो मृत्यूला कवटाळत आहे. सरकारने शेतकºयांना आणि शेती व्यवसायाला वाचवण्यासाठी स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करावी आणि सातबारा कोरा करावा, अशी मागणी शेतकºयांनी केली आहे..