विना अनुदानित शाळांतील शिक्षकांची पिळवणूक थांबवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2020 16:04 IST2020-09-05T16:02:38+5:302020-09-05T16:04:31+5:30

सिन्नर : नाशिक जिल्हा टी.डी.एफ. व विना अनुदानित शाळा कृती समितीच्या पदाधिर्का­यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर (वीर) यांची भेट घेऊन विना अनुदानित, अघोषित शाळांच्या पुन्हा तपासणी व अनावश्यक माहिती जमा करण्याबाबतीत चर्चा केली.

Stop extortion of teachers in unsubsidized schools | विना अनुदानित शाळांतील शिक्षकांची पिळवणूक थांबवा

विना अनुदानित शाळांतील शिक्षकांची पिळवणूक थांबवा

ठळक मुद्देनिवेदन : कृती समितीची शिक्षणाधिकारी झनकर यांच्याकडे मागणी

सिन्नर : नाशिक जिल्हा टी.डी.एफ. व विना अनुदानित शाळा कृती समितीच्या पदाधिर्का­यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर (वीर) यांची भेट घेऊन विना अनुदानित, अघोषित शाळांच्या पुन्हा तपासणी व अनावश्यक माहिती जमा करण्याबाबतीत चर्चा केली. विनाअनुदानित शाळांतील शिक्षकांची पिळवणूक थ्लृांबविण्याची मागणी पदाधिकाऱ्यांनी केली.
एक वर्षापूर्वी सदरच्या शाळा मंत्रालय स्तरावर घोषित होणे अपेक्षित असताना वित्त विभाग त्रुटी पुर्ततेसाठी माध्यमिक शिक्षणाधिर्का­यांकडे फाईल पाठवत असल्याने शिक्षक बांधव पुरते हादरून गेले आहेत. शासनाने अनेक तपासण्या, माहिती वेळोवेळी मागून केवळ टाईमपास चालवला आहे. आता येथ्लृून पुढे शाळा घोषित झाल्याशिवाय माहिती दिली जाणार नाही अशी भूमिका पदाधिर्का­यांनी मांडली.
शिक्षणाधिकारी डॉ. झनकर (वीर) यांनी एकही शाळा अनुदानापासून वंचित राहणार नाही असे आश्­वत करुन त्रुटी पूर्ण करून व्ही. सी. मध्ये हा विषय प्रभावीपणे मांडरार असल्याचे सांगितले. यावेळी कृती समितीचे अध्यक्ष भरत भामरे, जिल्हा टीडीएफचे कार्यवाह एस. बी. देशमुख, उपाध्यक्ष मोहन चकोर, बाळासाहेब ढोबळे, कांतीलाल नेरे, गोरख कुलधर, मनोज वाकचौरे, सोमनाथ जगदाळे, जर्नादन गायकवाड, दत्तात्रय विंचू, राजेंद्र महात्मे, सुभाष पवार, महाले आदींसह विनाअनुदानित शिक्षक बांधव-भगिणी उपस्थित होते.

 

 

Web Title: Stop extortion of teachers in unsubsidized schools