कारच्या धडकेने दुचाकीने घेतला पेट; एक ठार, दोन जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2022 01:01 IST2022-05-21T01:00:58+5:302022-05-21T01:01:26+5:30

नांदगाव- साकोरा रस्त्यावर शुक्रवारी दुपारी उड्डाणपुलाजवळ कार व दुचाकी यांच्यात समोरासमोर झालेल्या धडकेत दुचाकीवरील एक ठार झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.     

Stomach hit by car hit by bike; One killed, two injured | कारच्या धडकेने दुचाकीने घेतला पेट; एक ठार, दोन जखमी

कारच्या धडकेने दुचाकीने घेतला पेट; एक ठार, दोन जखमी

साकोरा : नांदगाव- साकोरा रस्त्यावर शुक्रवारी दुपारी उड्डाणपुलाजवळ कार व दुचाकी यांच्यात समोरासमोर झालेल्या धडकेत दुचाकीवरील एक ठार झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.     

        अपघातसमयी चारचाकी वाहनचालक नांदगावकडे जात असतानाच दुसऱ्या कारला ओव्हरटेक करताना समोरून येणारी दुचाकी यांच्यात जबर धडक होऊन कारच्या धडकेने दुचाकीस्वार फेकला जाऊन दुचाकीने पेट घॆतला. घटनेत तालुक्यातील कळमदरी पांझन वस्तीवरील समाधान गायकवाड (२६) हा ठार झाला. तर त्याच्यासोबत असलेला विलास धोत्रे (२४) हा गंभीर जखमी झाला. नांदगाव येथून कळमदरी जाताना उड्डाणपुलाजवळ समोरून साकोरा येथून येणारी एम. एच.१५ क्यु.एस. ९३३० व दुचाकी यांच्यात समोरासमोर भीषण अपघात झाला. अपघात इतका भयंकर होता की, दुचाकीही जागेवर जऴून खाक झाली. कऴमदरी येथील दुचाकी चालक समाधान गायकवाड, विलास धोत्रे यांना पुढील उपचाराकरिता घेऊन जात असताना रस्त्यात समाधान गायकवाड यांनी प्राण सोडला. तर चारचाकी वाहनात तीन प्रवासी होते. नांदगावचे पोलीस हवालदार राजू मोरे आदी तपास करीत आहेत.

-------------------------

 

Web Title: Stomach hit by car hit by bike; One killed, two injured