त्र्यंबक नाक्यावर बसने घेतला पेट; चालक-वाहकाचे प्रसंगावधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2018 19:18 IST2018-11-04T19:15:07+5:302018-11-04T19:18:10+5:30

नाशिकरोडवरुन प्रवाशी घेऊन उत्तमनगरकडे जात असलेली बस त्र्यंबकनाक्यावर आली असता अचानकपणे दुपारी चार वाजेच्या सुमारास चालकाशेजारी असलेल्या इंजिनच्या आतून धूर येऊ लागला.

Stomach has settled at Trimbakesh Naka; Driver's carriage | त्र्यंबक नाक्यावर बसने घेतला पेट; चालक-वाहकाचे प्रसंगावधान

त्र्यंबक नाक्यावर बसने घेतला पेट; चालक-वाहकाचे प्रसंगावधान

ठळक मुद्देबसमधील अग्निप्ररोधक यंत्राच्या सहाय्याने पावडरचा माराबसमध्ये सुमारे दहा ते पंधरा प्रवाशी होते.

नाशिक : शहर बस वाहतूक करणाऱ्या बसेसपैकी पंचवटी आगाराची बस (एम.एच.१५ अ‍ेके ८०८३) नाशिकरोडवरून त्र्यंबकनाक्यामार्गे उत्तमनगरकडे जात असताना अचानकपणे चालकाच्या कॅबीनमधून धूर येऊ लागला. चालकाने प्रसंगावधान राखून बस तत्काळ वाहनांच्या गराड्यातून बाजूला उभी के ली. वाहकाने अग्निशामक दलाशी संपर्क साधत माहिती दिल्याने अनर्थ टळला.
याबाबत अधिक माहिती अशी, नाशिकरोडवरुन प्रवाशी घेऊन उत्तमनगरकडे जात असलेली बस त्र्यंबकनाक्यावर आली असता अचानकपणे दुपारी चार वाजेच्या सुमारास चालकाशेजारी असलेल्या इंजिनच्या आतून धूर येऊ लागला. ही बाब चालक वाहकाच्या तत्काळ लक्षात आली. चालक संतोष घोडके याने बस सुरक्षितरित्या रस्त्याच्याकडेला उभी करत बसमधील अग्निप्ररोधक यंत्राच्या सहाय्याने पावडरचा मारा करत आग विझविण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, आगीने रौद्रावतार धारण करु नये, म्हणून महिला वाहक ज्योती अरिंगळे यांनी भ्रमणध्वनीवरुन अग्निशामक दलाशी संपर्क साधला. शिंगाडा तलाव येथून लिडिंग फायरमन इकबाल शेख, किशोर पाटील, विजय शिंदे, अनील गांगूर्डे, राजू पाटील, देविदास इंगळे हे जवान बंबासह अवघ्या दोन ते तीन मिनिटांत घटनास्थळी पोहचले. पाण्याचा मारा करुन आग विझविण्यात जवनांना यश आले. पावडरच्या सहाय्याने आग विझविण्याच्या प्रयत्नामुळे आगीने रौद्रावतार धारण केला नाही. जेव्हा बसने पेट घेतला तेव्हा बसमध्ये सुमारे दहा ते पंधरा प्रवाशी होते. चालक, वाहकांनी दाखविलेले प्रसंगावधान व अग्निशामक दलाच्या जवानांनी दाखविलेल्या प्रयत्नामुळे अनर्थ टळला.बसमधून धूर येऊ लागल्याचे लक्षात येताच परिसरातील व्यावसायिकांनीही मदतीसाठी बसच्या दिशेने धाव घेतली होती. या घटनेत बसचे जास्त नुकसान झाले नाही.

 

Web Title: Stomach has settled at Trimbakesh Naka; Driver's carriage