बसमधील महिलेची पर्स चोरीस; रोकड लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2019 00:20 IST2019-05-22T00:18:45+5:302019-05-22T00:20:42+5:30
नाशिकरोड बसस्थानकातून बसने कोपरगावला जाणाऱ्या महिला प्रवाशाची ६५ हजार रुपये किमतीचा ऐवज असलेली हॅन्डपर्स चोरट्याने हातोहात चोरून नेली.

बसमधील महिलेची पर्स चोरीस; रोकड लंपास
नाशिकरोड : नाशिकरोड बसस्थानकातून बसने कोपरगावला जाणाऱ्या महिला प्रवाशाची ६५ हजार रुपये किमतीचा ऐवज असलेली हॅन्डपर्स चोरट्याने हातोहात चोरून नेली. रेल्वे व बसस्थानक परिसरातील वाढत्या चोऱ्यांच्या घटना प्रवाशांच्या दृष्टीने डोकेदुखी ठरत आहे.
कोपरगावातील गांधी चौक कापड बाजार येथील ज्योत्स्ना पुरुषोत्तम पगारे (५३) या रविवारी दुपारी औरंगाबादरोड येथील मंगल कार्यालयात नातेवाइकांच्या लग्नासाठी आल्या होत्या. लग्न समारंभ आटोपून दुपारी चार वाजता नाशिकरोड बसस्थानकातून कोपरगावला जाणाºया बसमध्ये पगारे बसल्या. यावेळी चोरट्याने गर्दीचा फायदा पगारे यांच्या जवळील अडीच तोळ्याचा ६२ हजार ५०० रुपये किमतीचा सोन्याचा नवरंग हार, २४०० रुपये रोख असा ऐवज असलेली हॅन्डपर्स हातोहात चोरून नेली. बसवाहक तिकीट काढण्यासाठी आला असता पगारे यांना हातातील हॅन्डपर्स चोरीला गेल्याचे लक्षात आले. रेल्वे व बसस्थानकांत सुट्ट्यांमुळे प्रवाशांची गर्दी वाढली असून, दररोज छोट्या-मोठ्या चोºया होत असल्याने प्रवासी त्रस्त झाले आहेत. बसस्थानक आवारात असलेली पोलीस चौकी बंद असल्याने प्रवाशांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.