शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

... तरीही नाशिकच्या पालकमंत्रीपदी भुजबळच : जयंत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2021 08:56 IST

धमकी देण्याएवढा वाद मोठा नाही. भाजपला मनसेसोबत युती करण्याची इच्छा आहे. मात्र, भाजप मनसेसोबत युती करायला लाजतेय, पाटील यांचं वक्तव्य.

ठळक मुद्देभाजपला मनसेसोबत युती करण्याची इच्छा आहे. मात्र, भाजप मनसेसोबत युती करायला लाजतेय, पाटील यांचं वक्तव्य.

नाशिक : आमदार सुहास कांदे यांच्यासोबतचा वाद मिटेल आणि नाही मिटला तरी नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ हेच राहतील, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी येवला येथे पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

शिवसेनेचे आमदार सुहास कांदे व पालकमंत्री छगन भुजबळ यांच्यात निधी वाटपावरून वाद पेटला आहे. त्यात कांदे यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेत भुजबळ यांना पालकमंत्रीपदावरून हटवण्याची मागणी केली होती. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या बैठकीनिमित्त आलेले प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी सांगितले, छगन भुजबळ आणि शिवसेना आमदार कांदे यांच्यातील वाद हा स्थानिक असून अंडरवर्ल्डमधून आलेल्या धमकीबाबत मला माहिती नाही. 

ईडीच्या कारवाईबाबत बोलताना पाटील म्हणाले, अनिल देशमुख, एकनाथ खडसे यांना नाहक अडचणी निर्माण करण्याचे काम सुरू आहे. सुडाचे राजकारण सुरू आहे. परमबीर सिंह यांना कोण वाचवत आहे, हे सर्वांनाच माहीत आहे. पेट्रोल, डिझेलच्या किमतीप्रमाणे महागाईही वाढत आहे. पेट्रोल-डिझेलच्या वाढलेल्या किमतीचा पैसा केंद्राकडे जातोय. महागाईचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसल्याचे पाटील यांनी सांगितले. 

भाजप मनसेसोबत युती करताना लाजतेय 

  • भाजपला मनसेसोबत युती करण्याची इच्छा आहे. मात्र, भाजप मनसेसोबत युती करायला लाजतेय, असे भाजप-मनसे युतीवर बोलताना पाटील यांनी सांगितले. जे येतील त्यांना बरोबर घेऊ. 
  • मात्र, स्थानिक परिस्थिती पाहून आघाडीचा निर्णय होईल, कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहोत, याचा आगामी निवडणुकांशी संबंध नाही, असेही स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतील आघाडीबाबत बोलताना पाटील यांनी स्पष्ट केले.
टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलChhagan Bhujbalछगन भुजबळMaharashtraमहाराष्ट्रMNSमनसे