शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

सासऱ्याच्या पावलावर सुनेचेही पाऊल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2019 01:18 IST

भारतीय क्रांती दलातून कॉँग्रेस व कॉँग्रेसमधून भाजपात प्रवेश करून युती सरकारच्या कारकिर्दीत अवघ्या नऊ महिन्यांसाठी मंत्रिपद भूषविल्यानंतर पुन्हा राष्टवादी कॉँग्रेसमध्ये प्रवेश करून जवळपास तब्बल ४६ वर्षे नाशिक जिल्ह्यातील आदिवासी मतदारांच्या बळावर आठ वेळा विधानसभा निवडणूक जिंकणारे स्व. अर्जुन तुळशीराम (ए.टी.) पवार यांच्या धाकट्या सुनेने सासऱ्याच्या पावलावर पाऊल ठेवत राष्टवादीकडून उमेदवारी मिळत नसल्याचे पाहून भाजपाचे कमळ हाती घेतले आहे.

नाशिक : भारतीय क्रांती दलातून कॉँग्रेस व कॉँग्रेसमधून भाजपात प्रवेश करून युती सरकारच्या कारकिर्दीत अवघ्या नऊ महिन्यांसाठी मंत्रिपद भूषविल्यानंतर पुन्हा राष्टवादी कॉँग्रेसमध्ये प्रवेश करून जवळपास तब्बल ४६ वर्षे नाशिक जिल्ह्यातील आदिवासी मतदारांच्या बळावर आठ वेळा विधानसभा निवडणूक जिंकणारे स्व. अर्जुन तुळशीराम (ए.टी.) पवार यांच्या धाकट्या सुनेने सासऱ्याच्या पावलावर पाऊल ठेवत राष्टवादीकडून उमेदवारी मिळत नसल्याचे पाहून भाजपाचे कमळ हाती घेतले आहे.सन २०१४ मध्ये सर्वत्र मोदी लाट असताना डॉ. भारती पवार यांनी राष्टवादी कॉँग्रेस पक्षाकडून दिंडोरी मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढविण्याचे धाडस दाखविले. सासरे ए.टी. पवार यांची राजकीय पुण्याई एवढ्या एका शिदोरीवर त्या या निवडणुकीला सामोरे गेल्या. परंतु मोदी लाटेत त्यांना पराभव पत्कारावा लागला. मात्र त्यांनी मतदारांशी संपर्क व पक्ष संघटनेच्या कामात कसूर ठेवली नाही. तथापि, ए.टी. पवार यांच्या निधनानंतर कुटुंबातील कलहातून त्यांना घरातूनच होणाºया विरोधाचा पक्षाला फटका बसू नये म्हणून राष्ष्टÑवादीसाठी सुरक्षित समजल्या जाणाºया दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून यंदा भारती पवार यांना उमेदवारी न देता शिवसेनेतून आलेल्या धनराज महाले यांना ती दिली गेली. परिणामी नाराज भारती पवार या भाजपाच्या संपर्कात गेल्या.कळवण-सुरगाणा मतदारसंघावर जवळपास ४६ वर्षे आपली राजकीय हुकूमत कायम ठेवणाºया पवार कुटुंबीयांना मानणारा मोठा वर्ग आहे. लगतच्या बागलाण व देवळा मतदारसंघातदेखील आजही स्व. ए.टी. पवार यांच्या कार्यकर्तृत्वाचे दाखले दिले जातात. संपूर्ण आदिवासी असलेल्या या भागाला रस्ते, पाणी, विजेने जोडण्याचे श्रेय ए. टी. पवार यांनाच दिले जाते. परंतु त्यांच्या या राजकीय चढ-उतारात बंडखोरी व पक्षांतराचाही वाटा मोठा राहिला आहे. १९७१ मध्ये तत्कालीन मालेगाव लोकसभा मतदारसंघातून भारतीय लोकक्रांती दलाकडून पराभूत झालेल्या ए.टी. पवार यांनी १९७२मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत कळवण मतदारसंघातून एकतर्फी विजय मिळविला. त्यांनी कॉँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव केला. त्यानंतरच्या काळात देशपातळीवरील राजकीय घडामोडींचा विचार करून १९७८मध्ये यशवंतराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी कॉँग्रेसमध्ये प्रवेश केला व वसंतदादा पाटील यांच्या मंत्रिमंडळात चार महिन्यांसाठी मंत्रिपदही भूषविले. १९८०च्या निवडणुकीत ते कॉँग्रेसकडून विजयी झाले. मात्र १९८५च्या निवडणुकीत त्यांना समाजवादी कॉँग्रेसकडून पराभव पत्करावा लागला. त्यामुळे १९९०च्या निवडणुकीत कॉँग्रेसने उमेदवारीचा विचार न केल्याने ए. टी. पवार यांनी भाजपात प्रवेश केला. आणि ते निवडून आले. १९९५च्या निवडणुकीत युतीकडून कळवणमधून साहजिकच ए.टी. पवार यांना उमेदवारी देण्यात आली व ते पुन्हा भाजपाकडून निवडून आले. युती सरकारमध्ये अखेरच्या पर्वात नऊ महिन्यांसाठी त्यांना आदिवासी विकासमंत्री करण्यात आले. १९९९मध्ये राष्ट्रवादी कॉँग्रेसची निर्मिती झाल्यानंतर पवार यांनी राष्टÑवादीचे घड्याळ हाती बांधले व उमेदवारी घेऊन निवडूनही आले. विलासराव देशमुख मंत्रिमंडळात त्यांना राज्यमंत्री करण्यात आले.२००४ व २००९ मध्ये सलग राष्टवादीकडून निवडून आलेल्या ‘एटीं’ना २०१४ च्या निवडणुकीत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडून पराभव पत्करावा लागला. सोयीसोयीने पक्षांतर करणाºया व पक्षाकडून काहीच मिळत नसल्याचे पाहून अन्य पक्षांच्या वळचणीला जाण्याच्या सासऱ्यांच्या परंपरेची त्यांच्या स्नुषा भारती पवार यांनी पुनरावृत्ती केली आहे.काय होईल पवार कुटुंबीयातस्व. पवार यांचे मोठे पुत्र नितीन हे कळवण तालुक्यात जिल्हा परिषद सदस्य आहेत. त्यांची पत्नी जयश्री यादेखील सध्या जिल्हा परिषद सदस्य असून, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष आहेत. नितीन पवार कुटुंबीय व ए.टीं.चे धाकटे पुत्र प्रवीण यांच्या कुटुंबीयांचे सख्य नाही. अशावेळी डॉ. भारती प्रवीण पवार यांनी भाजपाकडून उमेदवारी केल्यास नितीन व जयश्री पवार यांना त्यांचे राजकीय अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी भारती पवार यांच्या विरोधात प्रचार करावा लागणार आहे. नितीन पवार हे विधानसभा निवडणुकीसाठी कळवणमधून राष्टÑवादीचे दावेदार मानले जातात. त्यामुळे त्यांना कुटुंबातील सदस्याच्या विरोधात जाहीर भूमिका घेणे क्रमप्राप्त आहे.मतदारसंघात अडचणींचा सामनाभाजपाचे तीन वेळा खासदार राहिलेल्या हरिश्चंद्र चव्हाण यांना नाकारून डॉ. भारती पवार यांना उमेदवारी दिल्याने साहजिकच  चव्हाण नाराज होतील व त्यांच्याकडून पक्षविरोधी भूमिका घेतली  जाईल, याची शक्यता कमी आहे. परंतु दिंडोरी लोकसभा मतदारसंघात समाविष्ट तीन विधानसभा मतदारसंघात राष्टÑवादीचे आमदार आहेत. भाजपा व सेनेचा एकेकच आमदार आहे. माकपाचे आमदार जिवा पांडू गावित हे स्वत:च लोकसभेच्या रिंगणात आहेत. त्यामुळे भारती पवार  यांना पक्षांतर करूनही अडचणींचाच सामना करावा लागण्याची चिन्हे आहेत.

टॅग्स :PoliticsराजकारणElectionनिवडणूकNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा